Monday, January 26, 2026
HomeनाशिकInd vs Pak Asia Cup 2025 : हस्तांदोलन वादानंतर भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने;...

Ind vs Pak Asia Cup 2025 : हस्तांदोलन वादानंतर भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने; ‘असा’ आहे आतापर्यंतचा दोन्ही संघांचा रेकॉर्ड

नवी दिल्ली | New Delhi

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या (Asia Cup 2025) सुपर ४ लढतींना २० सप्टेंबर पासून प्रारंभ झाला आहे. त्यानंतर आज (रविवारी) भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हायव्होल्टेज सामना खेळविण्यात येणार आहे. सुपर ४ लढतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सलमान अली आगाकडे तर भारतीय संघाचे सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता सामना खेळविण्यात येणार आहे.

- Advertisement -

भारतीय संघाने (Team India) सलामीच्या लढतीत संयुक्त अरब अमिरती विरूध्द १० गडी राखून दणदणीत विजय (Won) मिळवत चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर मागील रविवारी म्हणजे (दि.१४) रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात सामना खेळविण्यात आला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय मिळवला होता. संयुक्त अरब अमिरतीने ओमान विरूध्द विजय संपादन केल्यामुळे भारतीय संघाला सुपर ४ मध्ये प्रवेश निश्चित करता आला होता.

YouTube video player

त्यानंतर आज भारताला सलग दुसऱ्यांदा पाकिस्तान विरुद्ध विजय संपादन करण्याची संधी असणार आहे.पाकिस्तानने सलमान अली आगाच्या नेतृत्वाखाली खेळताना ओमान विरूध्द लढतीत ९३ धावांनी दणदणीत विजय संपादन केला होता. मात्र दुसऱ्या लढतीत भारतीय संघाकडून (Indian Team) पाकिस्तान संघाला ७ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.यानंतर बुधवारी संयुक्त अरब अमिरती विरूध्द ४१ धावांनी विजय संपादन करून पाकिस्तानने सुपर ४ मध्ये आपले स्थान निश्चित केले होते.

दरम्यान, पाकिस्तान संघाने यंदाच्या हंगामात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ३ सामने खेळले असून, २ सामन्यात विजय संपादन केला आहे. भारत आणि पाकिस्तान आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत १५ वेळा आमनेसामने आले असून, भारतीय संघाने ९ तर पाकिस्तानने ५ सामन्यात विजय संपादन केला आहे.आशिया चषक २०२२ मध्ये सुपर ४ मधील सामन्यात पाकिस्तानने ५ गडी राखून भारताला पराभवाचा धक्का दिला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी भारतीय संघ मैदानावर उतरणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘नियोजन’ च्या 756 कोटी 43 लाखांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 756 कोटी 43 लक्ष रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे....