Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजIND vs PAK : आज भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामना; कुणाचे पारडे...

IND vs PAK : आज भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामना; कुणाचे पारडे जड?

मुंबई | वृत्तसंस्था | Mumbai

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy) क्रिकेट स्पर्धेमध्ये उद्या (दि.२३) पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघांमध्ये हायव्होल्टेज सामना भारतीय बेळेनुसार दुपारी २:३० वाजता सामना खेळविण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे (Rohit Sharma) तर मोहम्मद रिझवानकडे (Mohammad Rizwan) पाकिस्तान संघाची धुरा असणार आहे. मात्र पाकिस्तान संघाचा फलंदाज फखर झमान दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. बदली खेळाडू म्हणून इमाम उल हक याची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

पाकिस्तान संघाला (Pakistan Team) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या सलामी लढतीत न्यूझीलंड विरूध्द ६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाने (Indian Team) बांगलादेश विरूध्द पहिल्या सामन्यात ६ गडी राखून दणदणीत विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांसाठी ही लढत अतिशय महत्वाची असणार आहे. पाकिस्तान संघाला पराभूत करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपला प्रवेश निक्षित करण्यासाठी रोहित सेनेचा प्रयत्न असणार आहे. दुसरीकडे भारतीय संघाला पराभूत करून उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखण्यासाठी पाकिस्तान सज्ज असणार आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ५ सामने खेळविण्यात आले आहेत. हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास पाकिस्तान संघाने ३ तर भारतीय संघाने २ सामन्यात विजय संपादन केला आहे. दोन्ही संघांमध्ये १३५ एकदिवसीय सामने खेळविण्यात आले असून, भारतीय संघाने ५७ तर पाकिस्तान संघाने ७३ सामन्यात बाजी मारली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघांमध्ये आयसीसी चनडे क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेमध्ये २०२३ मध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय संपादन केला होता.

भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार शुभमन गील, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पांड्या यांच्यावर असणार आहे. तसेच अष्टपैलूंमध्ये हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, चॉशिंग्टन सुंदर आहेत. गोलंदाजीत हर्षित राणा, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, अर्शदिपसिंग, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आहेत. तर पाकिस्तान संघाच्या फलंदाजीची मदार बाबर आझम, मोहम्मद रिझवान, इमाम उल हक, तैयब ताहीर, खुशदील शहा यांच्यावर तर गोलंदाजीत शाहिन आफ्रिदी, नसीम शहा, हॅरीस रौफ, अब्रार अहमद यांच्यावर असणार आहे. अष्टपैलूंमध्ये सलमान अली आधा, साऊद शकील आहेत. तसेच २३ सप्टेंबर २०१८ मध्ये दोन्ही संघांमध्ये दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाने ९ गडी राखून विजय संपादन केला होता.

भारत विरुद्ध पाकिस्तान रेकॉर्डस्

सर्वाधिक धावा : शिखर धवन – भारत, १० सामने ७०१ धावा, ३ अर्धशतके आणि ३ शतके, बेस्ट स्कोर ७९, रोहित शर्मा – भारत, ११ सामने ५२२ धावा, बेस्ट स्कोर १२३ नाबाद १ शतक आणि ४ अर्धशतके, मोहम्मद युसुफ – पाकिस्तान, १३ सामने ४८१ धावा बेस्ट स्कोर ८७ ३ शतके आणि १ अर्धशतक

सर्वाधिक बळी : रवींद्र जडेजा – ११ सामने, १६ बळी, बेस्ट बॉलिंग फीगर ५-३६ भारत, हसन अली – पाकिस्तान, ५ सामने, १३ बळी बेस्ट बॉलिंग फीगर

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...