मुंबई | Mumbai
आगामी टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. यात कर्णधारपदाची जबाबदारी सुर्यकुमार यादवकडे सोपविण्यात आली आहे. तर अक्षर पटलेची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघाने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली असून, यात शुभमन गिलला (Shubhman Gill) वगळण्यात आले आहे. तर सय्यद मुश्ताक अली टी २० स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा यष्टीरक्षक आणि डावखुरा फलंदाज ईशान किशनचे संघात पुनरागमन झाले आहे.
भारत आणि श्रीलंका (India vs Srilanka) संघांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत ५५ सामन्यांचा थरार क्रिकेट चाहत्यांना पहायला मिळणार आहे. भारतीय संघाचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. या गटात नामिबिया, नेदरलँड्स, पाकिस्तान आणि अमेरिका संघाचा समावेश आहे. अमेरिका विरूध्द लढतीने विश्वचषक मोहिमेची भारतीय संघ ७ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील वानखेडे स्टेडियम वर सुरुवात करणार आहे.
दरम्यान, टी २० वर्ल्डकप स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेला संघ न्यूझीलंड विरूध्द टी २० मालिकेत खेळणार आहे. तर या स्पर्धेसाठी रिंकूसिंगची (Rinku Singh) देखील संघात वापसी झाली आहे.
टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ
अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रिंकु सिंह, इशान किशन (विकेटकीपर)
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी २० मालिका
पहिला टी २० – २१ जानेवारी २०२६ – नागपूर
दुसरा टी २० – २३ जानेवारी २०२६ – रायपुर
तिसरा टी २० – २५ जानेवारी २०२६ – गुवाहाटी
चौथा टी २० – २६ जानेवारी २०२६ – विशाखापट्टणम
पाचवा टी २० – ३१ जानेवारी २०२६ – तिरुवनंतपुरम
टी २० विश्वचषक स्पर्धेतील सामने
०७ फेब्रुवारी २०२६ – भारत vs युएसए- मुंबई
१२ फेब्रुवारी २०२६ – भारत vs नामीबिया- दिल्ली
१५ फेब्रुवारी २०२६ – भारत vs पाकिस्तान- प्रेमदासा, कोलंबो
१८ फेब्रुवारी २०२६ – भारत vs नेदरलँड्स – अहमदाबाद




