Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजTeam India : भारतीय संघाला मिळाला नवा जर्सी स्पॉन्सर; 'या' कंपनीसोबत झाला...

Team India : भारतीय संघाला मिळाला नवा जर्सी स्पॉन्सर; ‘या’ कंपनीसोबत झाला करार

वर्षाला 'इतके' कोटी मिळणार

मुंबई | Mumbai

केंद्र सरकारने (Central Government) मागील महिन्यात रिअल-मनी गेमिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याच्या निर्णय घेतला होता. त्यामुळे २०२३ पासून भारतीय संघाच्या जर्सीचा प्रमुख प्रायोजक असणाऱ्या ड्रीम ११ भोवती अनिश्चितता निर्माण झाली होती. यामुळे बीसीसीआयने ड्रीम ११ (Dream 11) सोबत जर्सी स्पॉन्सरशिपचा करार संपुष्टात आणून नव्या जर्सी स्पॉन्सरच्या शोधाला सुरुवात केली होती. त्यानंतर आता भारतीय संघाला नवीन प्रायोजक मिळाला आहे.

- Advertisement -

भारतीय संघाला अपोलो टायर्स (Apollo Tyers) हा नवा प्रायोजक मिळाला असून, ते बीसीसीआयला (BCCI) प्रत्येक सामन्यासाठी ४.५ कोटी रुपये देणार आहेत. याआधी ड्रीम ११ चार कोटी रुपये देत होते. पुढील तीन वर्ष म्हणजेच २०२७ पर्यंत अपोलो टायर्सस़ोबत हा करार करण्यात आला आहे. भारतीय संघाचा प्रायोजक म्हणून कॅनवा, जे. के. टायर्स आणि बिर्ला आफ्टस या कंपन्या शर्यतीत होत्या. पंरतु, आता अपोलो टायर्स हा भारताचा नवा प्रायोजक झाला आहे.

YouTube video player

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नवीन प्रायोजकांसाठी निविदा सादर करण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर निश्चित केली होती. तसेच बीसीसीआयने हेही स्पष्ट केले होते की, कोणतीही बोली लावणारी कंपनी किंवा तिच्याशी संबंधित संघटना ऑनलाइन मनी गेमिंग, बेटिंग किंवा जुगाराशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसावी. त्यानंतर आता अपोलो टायर्स हा भारताचा प्रायोजक झाला आहे.

दरम्यान, अपोलो टायर्ससोबत करारानंतर दि.३० सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या महिला आयसीसी वर्ल्ड कपमध्ये (ICC World Cup) भारतीय संघ नवी स्पॉन्सर असलेली जर्सी घालून खेळणार आहे. तर पुरुष संघ ही जर्सी २ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या वेस्ट विंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...