Saturday, January 24, 2026
Homeक्रीडाIPL Auction 2026 : स्टार खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस; २३७.५५ कोटींची बोली,...

IPL Auction 2026 : स्टार खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस; २३७.५५ कोटींची बोली, ७७ जागांसाठी ३५९ खेळाडू मैदानात

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेचा १८ वा हंगाम सुरळीत पार पडल्यानंतर आगामी १९ व्या हंगामाबद्दल आयपीएल क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आयपीएल स्पर्धेचा मिनी लिलाव १६ डिसेंबर रोजी अबुधाबी येथे आयोजित करण्यात आला असून, भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता लिलावाला प्रारंभ होणार आहे.

- Advertisement -

यंदाच्या हंगामात स्पर्धेमध्ये १० संघ सहभागी होणार असून, ७७ रिक्त जागा भरण्यासाठी सर्व संघ २३७.५५ कोटी रुपये खर्च करणार आहेत. यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे (KKR) सर्वाधिक पर्स शिल्लक असून ६४.३ कोटी इतकी रक्कम शिल्लक आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाला १३ जागा भरायच्या आहेत.

YouTube video player

आयपीएल लिलावात तब्बल १३५५ खेळाडूंनी नावनोंदणी केली होती. त्यातून १००५ खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्यामुळे ३५० खेळाडूंवर पैशांची (Money) उधळण करण्यासाठी सर्व १० संघ सज्ज झाले असून जास्तीत जास्त खेळाडू खरेदी करून आपला संघ अधिक भक्कम करण्याचा सर्व संघांचा मानस आहे.

केकेआरची कॅमरून ग्रीनसाठी विक्रमी बोली ?

मॉक ऑक्समध्ये जे चित्र दिसले ते मिनी लिलावात खरेच दिसेल का? शाहरुख खानच्या मालकीचा संघ कॅमरून ग्रीनसाठी मोठी रक्कम मोजू शकतो का? याचा अचूक अंदाज लावणे कठीण आहे. पण केकेआरच्या पर्समधली तगड़ी रक्कम आणि लिलावात खेळाडूंवर पैसा ओतण्याचा त्यांचा छंद पाहता ते शक्य होऊ शकते. मेगा लिलावात केकेआरच्या संघाने व्यंकटेश अय्यरसाठी २३.७५ कोटी मोजून सर्वांनाच थक्क करून सोडले होते. त्याला नारळ दिल्यावर त्याच्या बदली कॅमरून ग्रीनसारख्या खेळाडूवर मोठी बोली लावणे केकेआरसाठी सहज शक्य आहे.

कोणत्या संघाकडे किती रक्कम?

कोलकाता नाईट रायडर्स – ६४.३ कोटी – १३ रिक्त जागा
चेन्नई सुपर किंग्ज – ४३.४ कोटी – ९ रिक्त जागा
गुजरात टायटन्स – १२.९ कोटी – ५ रिक्त जागा
सनरायझर्स हैदराबाद – २५.५ कोटी – १० रिक्त जागा
पंजाब किंग्ज – ११.४ कोटी – ४ रिक्त जागा
लखनौ सुपर जायंट्स २२.९५ कोटी – ६ रिक्त जागा
मुंबई इंडियन्स २.७५ कोटी – ५ जागा रिक्त
बंगळुरू १६.४ कोटी – ८ जागा रिक्त
राजस्थान रॉयल्स १६.५ कोटी – ९ जागा रिक्त

ताज्या बातम्या

Sangamner : अवैध कत्तलखान्यावर ‘एलसीबी’चा पुन्हा सर्जिकल स्ट्राईक

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner शहरातील अवैध कत्तलखान्यावर (Illegal Slaughterhouses) अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) शुक्रवारी (दि.23) महिन्याभरात चौथी मोठी कारवाई केली आहे. गोवंश जनावारांचे कत्तल...