Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRohit Sharma : रोहित शर्माची कर्णधार पदावरून हकालपट्टी; गिलकडे नवी जबाबदारी

Rohit Sharma : रोहित शर्माची कर्णधार पदावरून हकालपट्टी; गिलकडे नवी जबाबदारी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

नाशिक | Nashik

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत तीन एकदिवसीय आणि ५ टी २० सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. एकदिवसीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माची कर्णधारपदावरून हाकालपट्टी करण्यात आली असून, शुभमन गिलकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. विशेष म्हणजे शुभमन गिलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६ सामन्यात नेतृत्व केले आहे. ५ सामन्यात विजय संपादन केला आहे. तसेच १ सामना गमावला आहे.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वे मध्ये २०२७ मध्ये आयसीसी एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण स्पर्धेची पार्श्वभूमी लक्षात घेऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे. तसेच रोहित शर्मा, विराट कोहली खेळाडू म्हणून संघात सहभागी होणार आहेत. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना फेब्रुवारी मार्च महिन्यात आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा खेळली होती. या स्पर्धेमध्ये रोहित शर्मा ने क्रिकेट सामन्यात अखेरचे नेतृत्व केले होते.

YouTube video player

विशेष म्हणजे मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर संघात परतला आहे. त्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. के एल राहुल आणि जितेश शर्मा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात असणार आहेत . तसेच अष्टपैलू खेळाडूंमध्ये नितीश कुमार रेड्डीला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.

दरम्यान, टी २० संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. तर शुभमन गिल उपकर्णधार असणार आहे. जितेश शर्मा, संजू सॅमसन यष्टीरक्षक फलंदाज असणार आहेत. तर नितीश कुमार रेड्डी देखील टी २० संघात परतला आहे.

भारतीय संघ टी २०

शुभमन गिल, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन, जितेश शर्मा, अभिषेक शर्मा,शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकूसिंग,अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदिपसिंग, कुलदीप यादव, वाॅशिंगटन सुंदर, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती,

भारतीय संघ वनडेसाठी

रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, के एल राहुल, अक्षर पटेल,नितीश कुमार रेड्डी, वाॅशिंगटन सुंदर,अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, महंमद सिराज, अर्शदिपसिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...