Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIND vs ENG, 2nd Test : भारत-इंग्लंड यांच्यात आजपासून दुसरा कसोटी सामना;...

IND vs ENG, 2nd Test : भारत-इंग्लंड यांच्यात आजपासून दुसरा कसोटी सामना; ‘अशी’ असेल टीम इंडियाची प्लेईंग ११

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs ENG) क्रिकेट संघांमध्ये ५ कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू असून, लीड्स येथे खेळविण्यात आलेल्या सलामी सामन्यात यजमान इंग्लंड क्रिकेट संघाने १-० ने विजयी आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता मालिकेतील दुसरा सामना आजपासून (बुधवार) बर्मिंगहॅम येथील एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता खेळविण्यात येणार आहे.

- Advertisement -

भारतीय संघासाठी (Team India) हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. दुसऱ्या सामन्यात विजय (Won) संपादन करून मालिकेत १-१ ने बरोबरी साधण्याची संधी भारतीय संघाकडे असणार आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद शुभमन गिलकडे (Shubman Gill) तर बेन स्ट्रोक्सकडे इंग्लंड संघाचे कर्णधारपद असणार आहे.

YouTube video player

भारतीय संघाने बर्मिंगहॅम येथील एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर ८ कसोटी क्रिकेट सामने खेळले असून, १ सामना अनिर्णीत राहिला आहे. तर ७ सामन्यात भारतीय संघाला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. त्यामुळे बर्मिंगहॅम येथे विजयाचे खाते उघडण्यात भारतीय क्रिकेट संघाला यश मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

भारताचा संभाव्य संघ

यशस्वी जायसवाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल, ऋषभ पंत, नितिश रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, मोहम्म्द सिराज, प्रसिद्र कृष्णा, आकाशदीप/ जसप्रीत बुमराह

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी वेळापत्रक

पहिला कसोटी सामना : २० ते २४ जून
दुसरा कसोटी सामना : २ ते ६ जुलै
तिसरा कसोटी सामना : १० ते १४ जुलै
चौथा कसोटी सामना : २३ ते २७ जुलै
पाचवा कसोटी सामना : ३१ जुलै ते ४ ऑगस्ट

ताज्या बातम्या

लोकलमध्ये धक्का लागल्याचा राग, रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाला संपवलं; आरोपी तरूणाला अटक

0
मुंबई । Mumbai मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील गर्दी आणि त्यातून होणारे वाद किती भीषण रूप धारण करू शकतात, याचा एक धक्कादायक प्रकार शनिवारी संध्याकाळी मालाड...