Tuesday, April 8, 2025
Homeब्रेकिंग न्यूजIPL 2025 : आज डबल हेडर; 'हे' संघ आमनेसामने, कुणाचे पारडे जड

IPL 2025 : आज डबल हेडर; ‘हे’ संघ आमनेसामने, कुणाचे पारडे जड

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (मंगळवारी) दोन सामने खेळविण्यात येणार आहेत. यातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट (Kolkata Knight Riders and Lucknow Super Giants) यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना पंजाब किंग्ज विरूध्द चेन्नई सुपरकिंग्ज संघांमध्ये (Punjab Kings vs Chennai Super Kings) सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे. हा सामना मुल्लानपुर येथील महाराजा राजेवेंद्रसिंग क्रिकेट स्टेडियम चंदीगड येथे होणार आहे.

- Advertisement -

यामध्ये पंजाब किंग्ज संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) असणार आहे. तर ऋतुराज गायकवाडकडे (Ruturaj Gaikwad) चेन्नई सुपरकिंग्जचे कर्णधारपद असणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये चेन्नई सुपरकिंग्जने ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळताना सलामी लढतीत मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध ४ गडी राखून विजय संपादन करून विजयी सलामी दिली होती. मात्र, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आपली पराभवाची मालिका खंडित करण्याची संधी चेन्नई सुपरकिंग्जकडे असणार आहे.

दुसरीकडे पंजाब किंग्ज ने सलामीच्या दोन्ही सामन्यात गुजरात टायटन्स लखनौ सुपर जायंट्स विरूध्द विजय संपादन करून दणक्यात सुरुवात केली होती. मात्र राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध मुल्लानपुर येथील महाराजा राजेवेंद्रसिंग क्रिकेट स्टेडियम चंदीगड स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे विजयी मार्गावर परतण्यासाठी पंजाब किंग्ज सज्ज असणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ३० सामने खेळविण्यात आले असून, चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा हेड टू हेड आकडेवारी मध्ये दबदबा राहिला आहे. चेन्नई सुपरकिंग्जने १६ तसेच पंजाब किंग्जने १४ सामन्यात विजय संपादन केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Weather Update : उष्णतेने अंगाची लाहीलाही; नाशिकचे तापमान ४१ अंशांवर

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राज्यात सूर्य आग ओकू लागला असून, वाढत्या तापमानाने (Temperature) अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा ३५ ते...