मुंबई | Mumbai
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पाठोपाठ अँग्री यंग मॅन म्हणून ओळख असणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohali) देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. याबाबतची घोषणा विराटने इन्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट करत केली आहे.
View this post on Instagram
कोहलीने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
विराटने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी १४ वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बॅगी ब्लू जर्सी घातली होती. खरं सांगायचं तर, हा फॉरमॅट मला अशा प्रवासात घेऊन जाईल अशी मी कधीच कल्पना केली नव्हती. त्याने माझी परीक्षा घेतली, मला परिभाषित केले आणि मला असे धडे शिकवले जे मी आयुष्यभर माझ्यासोबत घेऊन जाईन. पांढऱ्या जर्सीमध्ये खेळणे हा माझ्यासाठी खूप खास आणि वैयक्तिक अनुभव आहे. कठोर परिश्रम, लांब दिवस, छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही, पण ते कायमचे तुमच्यासोबत राहतात. मी या फॉरमॅटपासून दूर जात असताना, ते सोपे नाही, पण सध्या ते योग्य वाटते. मी माझे सर्वस्व दिले आहे आणि त्याने मला अपेक्षेपेक्षा जास्त दिले आहे. मी खेळाबद्दल, मैदानावरील लोकांबद्दल आणि या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाबद्दल आभारी आहे. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहेन. त्याने पुढे त्याचा जर्सी नंबर लिहिला आणि ‘साइनिंग ऑफ’ असे म्हटले आहे.
विराट कोहलीची कसोटी कारकीर्द
विराट कोहलीने जून २०११ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध पहिला सामना खेळला होता. विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण १२३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये २१० डावांमध्ये विराट कोहलीने ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या आहेत. यामध्ये ३० शतकं आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा एक यशस्वी कर्णधार होता आणि त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत.