Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSmriti Mandhana : स्मृती-पलाशचं लग्न अखेर रद्द! स्वत: पोस्ट करत म्हणाली, "मला...

Smriti Mandhana : स्मृती-पलाशचं लग्न अखेर रद्द! स्वत: पोस्ट करत म्हणाली, “मला आता…”

मुंबई | Mumbai

भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांचे लग्न २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगली येथे होणार होते. मात्र लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. यानंतर स्मृती आणि पलाशने लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. पंरतु, आता स्मृतीने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत लग्न रद्द झाल्याची माहिती दिली आहे.

- Advertisement -

स्मृतीने पोस्ट करत म्हटले की, “गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा आणि अफवा पसरत आहेत, म्हणून मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं. मी खूप खाजगी स्वभावाची आहे, पण एक गोष्ट स्पष्ट सांगते की लग्न रद्द झालं आहे. हा विषय इथंच थांबवायला मला आवडेल आणि तुम्ही सगळ्यांनीही तसं करावं, अशी विनंती आहे. सध्या दोन्ही कुटुंबांची गोपनीयता राखावी आणि आम्हाला आमच्या वेगाने हे सगळं समजून घेऊन पुढे जाण्यासाठी थोडी मोकळीक द्यावी. ” असेही ती म्हणाली आहे.

YouTube video player

तसेच “मला विश्वास आहे की आपण सर्वांना चालवणारी एक उच्च शक्ती असते आणि माझ्यासाठी ती शक्ती नेहमीच माझ्या देशाचे सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करणे आणि शक्य तितकी विजेतेपदे मिळवणे हेच माझे ध्येय कायम राहील. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे.” असेही स्मृतीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, स्मृती मानधना हिने पलाश मुच्छलसोबतचे लग्न (Wedding) रद्द केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पलाश मुच्छल हा तिला धोका देत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता स्मृती मानधना आपल्या खेळावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत करत आहे. तर पलाश मुच्छलनेही पोस्ट केली आहे.

ताज्या बातम्या

ठाकरे

Sanjay Raut: आमच्याकडे फक्त तक्रार करणार? आम्हाला मतं देणार नाही देणार?...

0
मुंबई | Mumbaiशिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची ही...