मुंबई | Mumbai
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघांमध्ये (India vs West Indies Women’s Cricket Teams) ३ सामन्यांच्या टी २० मालिकेत यजमान भारतीय संघाने (Team India) पहिल्या टी २० सामन्यात ४९ धावांनी दणदणीत विजय संपादन करून १-० ने विजयी आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता मालिकेतील दुसरा सामना आज मंगळवारी (दि.१७) रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजता डीवाय पाटील स्टेडियम वर खेळविण्यात येणार आहे.
वेस्टइंडिज संघाची धुरा हिली मॅथ्यूजकडे असणार आहे. तर हरमनप्रित कौरकडे भारतीय संघाचे कर्णधारपद असणार आहे.मालिकेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्वाची असणार आहे. वेस्ट इंडिज संघ मालिकेत बरोबरी साधण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. तर भारतीय संघ मालिका विजय (Won) संपादन करण्यासाठी सज्ज असणार आहे. दोन्ही संघांमध्ये २१ टी २० सामने खेळविण्यात आले असून,भारतीय महिला संघाने १३ तर वेस्ट इंडिजने ८ सामन्यात विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे टी २० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेनंतर दोन्ही संघांची ही पहिलीच मालिका असणार आहे.
डीवाय पाटील स्टेडियम टी २० रेकॉर्डस्
सर्वाधिक धावा स्मिती मंधाना ६ सामने २६७ धावा सर्वाधिक स्कोर ७९ ३ अर्धशतके.
शेफाली वर्मा ५ सामने १४६ धावा सर्वाधिक स्कोर ६४ नाबाद १ अर्धशतक.
सर्वाधिक बळी ६ सामने ८ बळी बेस्ट बाॅलिंग फीगर २-२१
टिटास साधू ४ सामने ७ बळी बेस्ट बाॅलिंग फीगर ४-१७
सर्वाधिक धावा १९५-४ भारत विरुद्ध वेस्ट इंडिज १५ डिसेंबर २०२४
नीचांकी धावसंख्या भारत १३०-८ विरूध्द ऑस्ट्रेलिया.७ जानेवारी २०२४.
सर्वात मोठा विजय ४९ धावांनी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज १५ डिसेंबर सर्वाधिक अर्धशतके ३ बेथ मूनी ऑस्ट्रेलिया.
सर्वाधिक षटकार रिचा घोष १० षटकार.
सलिल परांजपे, नाशिक