मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये (Indian Premier League) आज (सोमवारी) लखनौ येथील अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा सामना लखनौ सुपर जायंट्स (Chennai Super Kings vs Lucknow Super Giants) संघाशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सामना खेळविण्यात येणार आहे.
चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीकडे (MS Dhoni) तर रिषभ पंतकडे (Rishabh Pant) लखनौ सुपर जायंट्स संघाचे कर्णधारपद असणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये लखनौ येथील अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर तिसरा सामना खेळविण्यात येणार आहे. आतापर्यंत खेळविण्यात आलेल्या दोन सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपरकिंग्ज विरूध्द विजय संपादन केला आहे. तसेच दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.
चेन्नई सुपरकिंग्ज संघाची कामगिरी यंदाच्या हंगामात निराशाजनक राहिली आहे. चेन्नई सुपरकिंग्जने ६ सामने खेळले असून, १ विजय संपादन केला आहे. तर ५ सामन्यात संघाचा पराभव झाला आहे. उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्ज संघाला आपल्या उर्वरित ८ सामन्यात विजय संपादन करावा लागणार आहे. तसेच इतर संघांच्या निकालावर लक्ष ठेवावे लागणार आहे. दोन्ही संघांत आयपीएल (IPL) क्रिकेट स्पर्धेमध्ये ५ सामने खेळविण्यात आले असून, चेन्नई सुपरकिंग्ज संघाने १ तर लखनौ सुपर जायंट्सने ३ सामन्यात विजय संपादन केला आहे.