Thursday, October 31, 2024
Homeब्रेकिंग न्यूजIPL Retention 2025 : कोणत्या संघाने कुठल्या खेळाडूला केलं रिटेन; पाहा संपूर्ण...

IPL Retention 2025 : कोणत्या संघाने कुठल्या खेळाडूला केलं रिटेन; पाहा संपूर्ण यादी

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ साठीच्या मेगालिलावाआधी आज (गुरुवारी) सर्व फ्रेंचाइजींनी आपल्या रिटेन खेळाडूंची (Player) यादी प्रसिद्ध केली असून ती बीसीसीआयकडे सोपविण्यात आली आहे. यंदा अनेक संघांनी (Team) कठोर निर्णय घेतले असून संघांमध्ये बऱ्याच वर्षांपासून असलेल्या खेळाडूंना रीलीज करण्यात आले आहे. तर काही संघांनी आपल्या आवडत्या खेळाडूंना कायम ठेवले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : ना. झिरवाळांनी ननाशीत दवाखाना दिल्याने हजारोंना फायदा – देशमुख

बीसीसीआयने (BCCI) संघातील खेळाडूंना रिटेन करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच ३१ ऑक्टोबर २०२४ ही दिली होती. त्यामुळे कोणता संघ किती आणि कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. यानंतर आता ज्या खेळाडूंना रिटेन करण्यात आले आहे त्यांची यादी समोर आली आहे.या यादीनुसार मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना रिटेन (Retained) केले आहे.

हे देखील वाचा : Maharashtra News : निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पैशांचा महापूर; नाशिक, कसारा घाटात नाकेबंदीत दोन कोटी ३१ लाखांची रोकड हस्तगत

संघ आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे

मुंबई इंडियन्स

हार्दिक पंड्या (१६.३५ कोटी), रोहित शर्मा (१६.३० कोटी), सूर्यकुमार यादव (१६.३५ कोटी), जसप्रीत बुमराह (१८ कोटी), तिलक वर्मा (८ कोटी)

कोलकाता नाइट रायडर्स

रिंकू सिंह (१३ कोटी), वरुण चक्रवर्ती (१२ कोटी), सुनील नरेन (१२ कोटी), आंद्रे रसेल (१२ कोटी), हर्षित राणा (४ कोटी), रमनदीप सिंह (४ कोटी)

चेन्नई सुपर किंग्ज

ऋतुराज गायकवाड (१८ कोटी), मथीशा पथिराना (१३ कोटी), शिवम दुबे (१२ कोटी), रविंद्र जडेजा (१८ कोटी), एमएस धोनी (४ कोटी)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

विराट कोहली (२१ कोटी), रजत पाटीदार (११ कोटी), यश दयाल (५ कोटी) पंजाब किंग्ज शशांक सिंह (५.५ कोटी), प्रभासिमरन सिंह (४ कोटी)

दिल्ली कॅपिटल्स

कुलदीप यादव (१३.२५ कोटी), अक्षर पटेल (१६.५० कोटी), ट्रिस्टन स्टब्ज (१० कोटी), अभिषेक पोरेल (४ कोटी)

लखनऊ सुपर जायंट्स

निकोलस पुरन (२१ कोटी), रवी बिश्नोई (११ कोटी), मयांक यादव (११ कोटी), मोहसिन खान (४ कोटी), आयुष बदोनी (४ कोटी)

राजस्थान रॉयल्स

संजू सॅमसन (१८ कोटी), यशस्वी जयस्वाल (१८ कोटी), रियान पराग (१४ कोटी), शिमरन हेटमायर (११ कोटी), ध्रुव जुरेल (१४ कोटी), संदीप शर्मा (४ कोटी)

सनरायजर्स हैदराबाद

पॅट कमिन्स (१८ कोटी), अभिषेक शर्मा (१४ कोटी), नितीश कुमार (६ कोटी), हेनरिक क्लासेन (२३ कोटी), ट्रेविस हेड (१४ कोटी)

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या