नवी दिल्ली | New Delhi
आयपीएल २०२५ (IPL 2025) स्पर्धेचा मेगा लिलाव (Mega Auction) सध्या सौदी अरेबिया येथील जेध्दाह येथे सुरू आहे.यात भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.२७ कोटी रुपये खर्च करून लखनौ सुपर जायंट्स संघाने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले आहे.तर दुसरीकडे पंजाब किंग्ज संघाने २६.७५ कोटी रुपये खर्च करून श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) संघात सामील करून घेतले.
हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात कोणत्या पक्षाला किती मतं? समोर आली आकडेवारी
दिल्ली कॅपिटल्स संघाने १४ कोटी रुपये खर्च करून भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज के एल राहुलला (KL Rahul) संघात स्थान दिले आहे. तसेच मिचेल स्टार्क पुढील वर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. ११.७५ रुपयांत त्याला स्थान देण्यात आले आहे.भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी सनरायझर्स हैदराबाद संघाने १० कोटी रुपयात खरेदी केले आहे.तर यजुवेंद्र चहलला पंजाब किंग्ज संघाने १८ कोटी रुपये खर्च करून आपल्या संघात स्थान दिले आहे.
हे देखील वाचा : Maharashtra News : राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड
तसेच जॉस बटलरला गुजरात टायटन्सने खरेदी केली आहे. तर डेव्हिड मिलरला लखनऊ सुपर जायंट्सने, कगिसो रबाडाला गुजरात टायटन्सने विकत घेतले आहे. याशिवाय मोहम्मद सिराज गुजरात टायटन्सकडून खेळतांना दिसणार आहे.तर इंग्लंडचा अष्टपैलू लियम लिंगविस्टन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळणार आहे.पहिल्या सेटमध्ये ६ खेळाडूंवर बोली लावण्यात आली. तसेच पंजाब किंग्ज संघाने १८ कोटी रुपये देऊन राईट टू मॅच कार्ड वापरून अर्शदिपसिंगला संघात स्थान दिले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा