Friday, November 22, 2024
Homeक्रीडाAsia Cup 2024 : भारताचा अंतिम सामन्यात पराभव; श्रीलंकेने आशिया चषकावर कोरले...

Asia Cup 2024 : भारताचा अंतिम सामन्यात पराभव; श्रीलंकेने आशिया चषकावर कोरले नाव

नवी दिल्ली | New Delhi

श्रीलंका महिला संघाने (Woman Team) भारतीय महिला संघावर आठ गडी राखून विजय मिळवत आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) ६० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाज करताना १६५ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने दिलेल्या १६६ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची दमदार सुरुवात झाली होती.

- Advertisement -

हे देखील वाचा : Paris Olympic 2024 : मनू भाकेरने रचला इतिहास; नेमबाजीत मिळवून दिले पहिले पदक

यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेने (ShriLanka) आपल्या डावाची चांगली सुरुवात करत विजयासाठी दिलेले १६६ धावांचे आव्हान १८.४ षटकांत २ गडी गमावून पूर्ण केले. श्रीलंकेसाठी कर्णधार चमिरा अटापटूने आणि हर्षिता समरविक्रमा या दोघींनी अर्धशतकी खेळी केली. या दोघींच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेला विजय मिळवता आला.

हे देखील वाचा : IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून टी २० मालिका; कुणाला मिळणार संधी?

श्रीलंकेची कर्मधार चमिरा अटापटूने ४३ चेंडूंत ६१ धावांची खेळी केली, पण तिला दीप्ती शर्माने (Deepati Sharma) बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले होते. पण श्रीलंकेची हर्षिता समरविक्रमा त्यानंतर भारताच्या विजयाच्या मार्गातील मोठा अडसर ठरली. हर्षिताने नाबाद ६९ धावांची खेळी साकारत हा सामना श्रीलंकेच्या बाजूने फिरवला.

हे देखील वाचा : श्रीलंका दौऱ्यामध्ये कोण असणार भारताच्या कोचिंग स्टाफमध्ये? जाणून घ्या

दरम्यान, त्यानंतर श्रीलंकेने आशिया चषकाच्या ( Asia Cup) अंतिम सामन्यात भारतावर ८ गडी राखून विजय मिळवला. श्रीलंकेने या विजयासह इतिहास (History) रचला आहे.कारण पहिल्यांदाच त्यांना आशिया चषक जिंकता (Won) आला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या