Tuesday, October 22, 2024
Homeनगरएसआरपी केंद्राच्या उद्घाटनावरून आ. पवार व पोलीस आमने-सामने

एसआरपी केंद्राच्या उद्घाटनावरून आ. पवार व पोलीस आमने-सामने

कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी रस्ता खोदत उभी केली चार चाकी वाहने

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेडमधील कुसडगावच्या एसआरपी केंद्राचे लोकार्पण गुरूवारी वाद्गस्त ठरले. यावेळी लोकार्पण करण्यासाठी पोहचलेले राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार आणि त्यांच्या समर्थकांना पोलीसांनी अडवले. यावरून काही काळ आ. पवार, त्यांचे समर्थक आणि पोलीस आमनेसामने आले होते. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र, शेवटपर्यंत पोलिसांनी आ. पवार आणि त्यांच्या समर्थकांना या केंद्रापर्यंत पोहचू दिले नाही. अखेर रस्त्यावर दोघाच्या हातात रिबन देत त्या कापून आ. पवार यांनी या केंद्राचे लोकार्पण केल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

दरम्यान, याठिकाणी आक्रमक झालेल्या आ. पवार यांच्या कार्यकर्त्यांनी केंद्राच्या बाहेरच ठिय्या मांडला आणि देवेंद्र फडणवीस, आ. राम शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. गुरूवारी आ. पवार यांच्या पुढाकाराने होत असलेल्या राज्य राखीव दल प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या आ. पवारांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी अडवलं. पोलिसांनी चार चाकी वाहने, लोखंडी बॅरिकेट्स आणि रस्ता खोदून लाकडाच्या सहाय्याने तो बंद केला. या प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आ. रोहित पवार केले होते. मात्र या कार्यक्रमाला राज्य राखीव पोलीस दल आणि प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

याठिकाणी आलेल्या आ. पवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडवल्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी आ.पवार म्हणाले, कर्जत-जामखेडचे हे केंद्र दुसर्‍या जिल्ह्यात गेलं असताना त्याविरोधात एक ब्र शब्द काढण्याचीही इथल्या तत्कालीन लोकप्रतिनिधीची मंत्री असूनही हिंमत झाली नाही. पण मविआ सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे केंद्र पुन्हा कुसडगाव (ता. जामखेड) इथं मंजूर केल्याने ते आज सुरु झालंय.

या केंद्राची पाहणी करण्यापासून रोखण्यासाठी एसआरपीएफ केंद्राच्या वाटेत चक्क काटे, बॅरिकेट्स आणि 200 पोलिसांचा बंदोबस्त लावण्याचं काम एका अहंकारी स्थानिक नेत्याच्या इशार्‍यावर सरकार करतंय. पण स्वाभिमानी कर्जत-जामखेडकर त्यांचा अहंकार चिरडल्याशिवाय राहणार नाही, असा आरोप केला. दरम्यान, या केंद्राच्या परिसारात काल तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. केंद्राकडे जाणारा रस्ता पोलीसांनी रोखल्याने आक्रमक पवार समर्थक आणि पोलीसांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या