पुणे | Pune
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ दरम्यान दहावी आणि बारावीच्या पारीक्षा (SSC and HSC Exam) घेण्यात आली होती. त्यामुळे दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे. मात्र, आता निकालाची (Result) प्रतीक्षा लवकरच संपणार असून, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने थेट निकालाची तारीखच सांगितली आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या १५ मेपर्यंत दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होतील”, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या (State Board Of Education) एका अधिकाऱ्याने दिली आहे. यात ५ ते १० जून दरम्यान दहावीचा निकाल, तर १५ मे पर्यंत बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप निकालाची अधिकृत तारीख (Date) जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून एक पत्रकार परिषद घेतली जाण्याची शक्यता आहे. तेव्हा निकालाची वेळ आणि तारीख जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in
विद्यार्थ्यांनी असा चेक करावा निकाल
- विद्यार्थ्यांनी सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जावे.
- होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल २०२५’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करावे.
- क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे अचूक नाव टाका.
- त्यानंतर ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.
- यानंतर तुमचा रिझर्ट स्क्रीनवर दिसेल.
- हा रिझर्ट डाऊनलोड करून ठेवा.