Friday, January 23, 2026
HomeनगरAccident News : दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात बस बोर्डाला धडकली

Accident News : दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात बस बोर्डाला धडकली

बस चालकासह 6 जण जखमी

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

बसला अचानक आडव्या आलेल्या दुचाकीस्वारास वाचविताना बस पेट्रोल पंपाच्या जाहिरात बोर्डाला धडकल्याने (ST Bus Accident) एसटी बसमधील चालकासह 6 जण जखमी (Injured) झाले. हा अपघात 21 जानेवारीला सकाळी दहा वाजता अस्तगाव (Astgav) माथ्यावरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर घडली.

- Advertisement -

या अपघातात बस चालक विजय खैरनार (रा. येवला), शकिलखान पठाण (रा. येवला), मीराबाई लोखंडे (रा. राहुरी स्टेशन), सुभद्राबाई पुंड (रा. ममदापूर ता. राहाता), अपर्णा वाघमारे (रा. शिर्डी), संजय लहारे (रा. वाकडी) अशी जखमींची नावे आहेत. येवला आगाराची (Yeola Depo) बस क्रमांक एमएच-14 एमएच 7033 ही येवल्यावरून पुण्याच्या दिशेने जाताना अस्तगाव माथ्यावर इंडियन पेट्रोल पंपाजवळ एक अज्ञात मोटारसायकलस्वाराने कोणताही इशारा न देता बससमोर अचानक मोटारसायकल आडवी घातल्याने बस चालकाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना बस उजव्या बाजूला खाली उतरवत असताना इंडियन ऑईल पेट्रोलपंपाच्या बोर्डाला जावून जोरात धडकल्याने बसचालक व बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.

YouTube video player

जखमींना दवाखान्यात न नेता व अपघाताची (Accident) खबर न देता सदर घटना ठिकाणाहून अज्ञात मोटारसायकलस्वार निघून गेला, अशी फिर्याद बस चालक विजय नबु खैरनार यांनी दिल्यावरून राहाता पोलिसांनी (Rahata Police) अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार डी. व्ही. पवार हे करत आहे.

ताज्या बातम्या

Suicide News : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नवीन घर घेण्यासाठी आणि धंदा टाकण्यासाठी माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून होणार्‍या छळाला कंटाळून बोल्हेगाव उपनगरात राहणार्‍या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली....