Thursday, February 5, 2026
Homeक्राईमCrime News : एसटी वाहकाला प्रवाशाकडून मारहाण

Crime News : एसटी वाहकाला प्रवाशाकडून मारहाण

तिकीटाच्या पैशावरून वाद || एक जणाविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तिकीटाच्या पैशावरून एसटी वाहक व प्रवाशामध्ये वाद झाला. या वादातून प्रवाशाने वाहकाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना सोमवारी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास नेवासकर पेट्रोल पंप, मार्केटयार्ड येथे घडली. या प्रकरणी वाहक राजेंद्र कराळे (रा. आगडगाव, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहील साळवे (वय 21 रा. भिंगारदिवे मळा, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी कराळे हे 2003 पासून एसटी महामंडळात वाहक पदावर कार्यरत आहेत.

- Advertisement -

सोमवारी पहाटे 5 वाजता ते आपल्या सहकारी चालक नीलेश शेळके (रा. गुणवडी, ता. नगर) यांच्यासह एमएच 14 बीएल 0040 क्रमांकाच्या बसवर नगर ते पुणे मार्गावर ड्युटीवर होते. बस तारकपूर स्थानकाहून निघाल्यानंतर 5.30 वाजता नेवासकर पेट्रोलपंपाजवळ प्रवाशी साळवे याला तिकीट मागितले असता, तो ऑनलाईन तिकीट काढणार असल्याचे सांगू लागला. वाहक कराळे यांनी ऑनलाईन सर्व्हेर बंद आहे, रोख रक्कम देऊन तिकीट काढावे लागेल असे सांगितल्यावर साळवे याने वाद घालून शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर साळवे याने कराळे यांची गचंडी पकडून त्यांना बसमधून खाली रस्त्यावर ओढले व मारहाण केली. तु जास्त शहाणा झाला आहेस काय, मीच पाहतो गाडी कशी घेऊन जातोस, असे म्हणत पुन्हा मारहाण केली.

YouTube video player

हा प्रकार पाहून चालक शेळके गाडी थांबवून खाली आले. त्यांनाही सदर प्रवाशाने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. मारहाणीमध्ये वाहक कराळे यांचा मोबाईल देखील खाली पडून खराब झाला. यानंतर दोघांनी मिळून सदर प्रवाशाला पुणे बसस्थानक नियंत्रण कक्ष येथे नेले. तिथे घटनेची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याला दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. साळवे विरोधात शासकीय कामात अडथळा, मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Crime News : शिक्षिकेची साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar टेलिग्रामवर हॉटेल रेटिंग व ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून खासगी महाविद्यालयातील शिक्षिकेची तब्बल 5 लाख 45 हजार 968...