Tuesday, March 25, 2025
Homeनगरएसटी बसच्या चालक व वाहकाला मारहाण

एसटी बसच्या चालक व वाहकाला मारहाण

तारकपूर बस स्थानकावरील घटना; तिघांविरूध्द पोलिसांत गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एसटी बसच्या चालक व वाहक यांना अनोळखी व्यक्तींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चालकाचा सरकारी गणवेश फाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना शनिवारी (17 ऑगस्ट) सायंकाळी येथील तारकपूर बस स्थानकावर घडली. याप्रकरणी वाहक शैला अमृत क्षीरसागर (वय 33 रा. पारनेर) यांनी रात्री 12 वाजता दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

वाहक शैला क्षीरसागर व चालक संजय परशराम पवार (रा. पारनेर) हे त्यांच्या ताब्यातील बस (एमएच 14 बीटी 3516) घेऊन शनिवारी दुपारी साडेबारा वाजता नाशिक येथून नगरमार्गे पारनेरकडे निघाले होते. बस लोणी येथील पीएमटी स्टॉपवर आली असता एका प्रवाशाने बसला हात केला. परंतु बसमध्ये जागा नसल्याने त्यांनी त्याला बसमध्ये घेतले नाही. बस लोणी बस स्थानकावर आल्यानंतर तो प्रवाशी खासगी वाहनाने तेथे आला. त्याने वाहक क्षीरसागर व चालक पवार यांच्यासोबत बसमध्ये घेतले नाही म्हणून हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ केली. सदरचा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांनी त्या व्यक्तीला मारहाण करण्यास सुरूवात केली असता तो तेथून पळून गेला.

क्षीरसागर व पवार सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नगर शहरातील तारकपूर बस स्थानकावर बस घेऊन आले असता तेथे दोन अनोळखी व्यक्ती बसमध्ये घुसले व त्यांनी क्षीरसागर व पवार यांना शिवीगाळ केली. ‘तुमच्यामुळे आमच्या माणसाला लोणीमध्ये लोकांनी मारहाण केली आहे’ असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पवार यांचा सरकारी गणवेश फाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ‘तुम्ही पुढे कोठला येथे या, तुमच्याकडे पाहतो’, अशी धमकी देऊन ते तेथून निघून गेले. दरम्यान, वाहक क्षीरसागर व चालक पवार यांनी तारकपूर बस स्थानकावर बस उभी करून तोफखाना पोलीस ठाणे गाठले व तिघांविरूध्द फिर्याद दिली आहे. पोलीस अंमलदार विनोद गंगावणे अधिक तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...