Friday, July 5, 2024
Homeक्राईमएसटी बसमध्ये दागिने चोरणारी महिलांची टोळी गजाआड

एसटी बसमध्ये दागिने चोरणारी महिलांची टोळी गजाआड

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

अहमदनगर जिल्हा व राहुरी तालुक्यातील नगर मनमाड राज्य महामार्गावर (Nagar Manmad Highway) श्रीरामपूर ते राहुरी जाणार्‍या एसटी बसमधून 65 वर्षीय महिलेचे दागिने (Jewelry) लंपास करणार्‍या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चार व संगमनेर (Sangamner) तालुक्यातील दोन महिलांना गजाआड करण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. दिनांक 18 जून 2024 रोजी सकाळी दहा वाजे दरम्यान राहुरी फॅक्टरी ते श्रीरामपूर दरम्यान जाणार्‍या एसटी बसमध्ये अज्ञात चोरट्याने राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील एका 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने (Gold Jewelry) एसटी बस मधुन लंपास झाल्याचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना राहुरी कृषी विद्यापीठ (Rahuri Agricultural University) परिसरामध्ये सहा महिला संशयित आढळून आल्या. राहुरी पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या त्या महिला एसटी बसमध्ये चोरी करत असताना आढळून आल्या आहेत.

पकडलेल्या महिला या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील व संगमनेर (Sangamner) तालुक्यातील असून त्यांच्या विरोधात चिंचविहिरे येथील 65 वर्षीय मंजुळाबाई भाऊसाहेब झांबरे यांच्या फिर्यादी नुसार गु.र.नं. 734/2024 भा.द.वि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. गौरी रामु कट्टी (वय 30), दिपा अशोक कट्टी (वय 27), गीता व्यंकटेश कट्टी (वय 21), नक्षत्रा कल्याण दुवाणी (वय 21 सर्व राहणार पाथर्डी नाका, ता. जि. नाशिक) तसेच गायत्री तेज सारले (वय 23), रुपा राजु सारले (वय 25 रा. विटभट्टी जवळ ता. संगमनेर जि. अ. नगर) या महिला आरोपींना पोलिस पथकाने ताब्यात घेतले होते. या महिलांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या