Wednesday, March 26, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातली एसटी सेवा सुरळीत सुरु; मंत्री उदय सामंतांसोबत मागण्यांबाबत बैठक

राज्यातली एसटी सेवा सुरळीत सुरु; मंत्री उदय सामंतांसोबत मागण्यांबाबत बैठक

मुंबई | Mumbai

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी आजपासून दिलेल्या एसटी संपाच्या आवाहनाला (ST Workers Strike) फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नसून आंदोलनावर भाष्य करताना सदावर्ते म्हणाले, आंदोलन सुरू करण्याआधी या सरकारने आम्हाला चर्चेसाठी बोलवलेय. त्यामुळे सरकारच्या भूमिकेनंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करु असे सदावर्ते म्हणाले.

- Advertisement -

सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी आज दिलेल्या एसटी बंदच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता मात्र हा दावाही फोल ठरताना दिसतोय. राज्यातील वर्धा विभागातील सकाळच्या सत्रात १०० टक्के वाहतूक सुरु आहे. कोल्हापुरातही सकाळच्या सत्रातील एसटी सुरु आहेत. माजलगाव आगारातही एसटी बसेस सुरु आहेत. त्यासोबतच ठाणे, पाटोदा, दिग्रस, हिंगोली आणि कळंब, नाशिक आगारातील एसटी बससेवा १०० टक्के सुरु आहे.

काय आहेत मागण्या

एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, आदींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. एसटी महामंडळाच्या ताफ्यात ८५ टक्के नादुरुस्त बसेस धावत आहे. सातवा वेतन आयोग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...