Saturday, May 25, 2024
Homeमहाराष्ट्रMaratha Andolan : पुण्याहून जालना, अहमदनगर, संभाजीनगरला जाणाऱ्या बसेस रद्द... प्रवाशांचे हाल

Maratha Andolan : पुण्याहून जालना, अहमदनगर, संभाजीनगरला जाणाऱ्या बसेस रद्द… प्रवाशांचे हाल

पुणे | Pune

जालना येथील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात त्याचे संतप्त पडसाद उमटले. राज्यभरात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन सकल मराठा समाजाने या घटनेचा तीव्र निषेध करत आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडल्यानंतर त्याच रात्री व शनिवारी अनेक ठिकाणी जाळपोळीच्याही घटना घडल्या आहेत. संतप्त मराठा तरुणांनी काही ठिकाणी एसटी बससेची जाळपोळ व तोडफोड केल्याचेही समोर आले आहे.

- Advertisement -

अशातच पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याहून अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालन्याला जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून संभाजीनगर आणि जालन्याला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. पुण्यावरून एसटीने छत्रपती संभाजीनगरला, जालन्याला निघालेले बरेच प्रवासी अडकून पडल्याचे समोर आले आहे. प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबात वृत्त दिले आहे.

‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत किस्सा खुर्चीचा! शरद पवार अन् ममता बॅनर्जींमध्ये नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

तसेच लातूर मध्यवर्ती बस स्थानकातून लांब पल्ल्यांवरील गाड्यांच्या फेऱ्या आजही रद्द करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने परिवहन विभागाने बस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहतूक सेवेला मोठा फटका बसलाय. दरम्यान प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. मात्र जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरु राहतील अशी माहिती परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

Maratha Andolan : मराठा आंदोलनाचा भडका! सरपंचाने जाळली स्वत:ची कार, ‘एक मराठा, लाख मराठा’च्या दिल्या घोषणा

- Advertisment -

ताज्या बातम्या