Thursday, January 8, 2026
Homeमहाराष्ट्रST Bus: महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बसफेऱ्या अनिश्चित काळासाठी रद्द, प्रवाशांची गैरसोय

ST Bus: महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बसफेऱ्या अनिश्चित काळासाठी रद्द, प्रवाशांची गैरसोय

मुंबई । Mumbai

कर्नाटकमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) बसवर हल्ला करण्यात आला. कन्नड रक्षक वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी एसटी बसचालकाच्या तोंडाला काळं फासून त्याला मारहाण केली. चालकाला कन्नड भाषा येते का, याची विचारणा करत हा हल्ला करण्यात आला.

- Advertisement -

या घटनेनंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कडक भूमिका घेतली. त्यांच्या आदेशानुसार कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या सर्व एसटी बससेवा तातडीने थांबविण्यात आल्या. या निर्णयामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना मोठी गैरसोय होत आहे.

YouTube video player

शुक्रवारी रात्री कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे ही घटना घडली. कन्नड समर्थकांनी एसटी बस चालकावर हल्ला करत त्याच्या तोंडाला काळं फासले आणि मारहाण केली. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एसटी महामंडळाने बससेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी सांगितले की, कोल्हापुरातून रोज कर्नाटकात ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षिततेसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, परिवहन मंत्री सरनाईक यांनी या घटनेत जखमी झालेले चालक भास्कर जाधव यांच्याशी दूरध्वनीवर बोलून त्यांना धीर दिला. तसंच ” या प्रकरणात तुम्ही एकटे नसून, महायुती सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहे.” अशी ग्वाही देखील दिली.

तसंच कर्नाटक शासन या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन जोपर्यंत आपल्या शासनाची चर्चा करत नाही तोपर्यंत त्या भागातील महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात येतील’ असे निर्देश देखील त्यांनी एसटी महामंडळाला यावेळी दिले आहे.

ताज्या बातम्या

Parner : पंतप्रधान संग्रहालयात अण्णांचा पत्रव्यवहार

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्याची दखल आता पंतप्रधान संग्रहालयाने घेतली असून अण्णांनी सरकार दरबारी केलेला पत्रव्यवहार जतन केला जाणार आहे....