Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्यामंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?

मुंबई | Mumbai

गेल्या वर्षी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis Government) यांनी राज्यात भाजप-शिवसेना शिंदे गटाचे सरकार स्थापन केले. पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर गेल्या वर्ष भरापासून मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinate Expansion) चर्चा सुरु होती. शिवसेना-भाजप सरकारमधील अनेक आमदार आपल्याला मंत्रिपद मिळावे यासाठी देव पाण्यात ठेऊन बसले आहे. त्यातच आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री झाले असल्याने सरकार लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

“माझे राजकीय करिअर संपवण्याचा डाव, सोनिया गांधी, राहुल गांधींना…”; काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी मांडली भूमिका

त्यातच आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला असून येत्या ९ किंवा १० तारखेला (9 or 10th July Cabinate Expansion) मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे म्हंटले जाते. पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यांना त्या -त्या खात्याची माहिती असावी यासाठी आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून, येत्या ९ किंवा १० जुलैला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

गुरवारी रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नंदनवन या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि भाजपचे आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, सरकारमध्ये राष्ट्रवादीची एन्ट्री झाल्याने आणि त्यातच ९ आमदारांचा शपथविधी झाल्याने शिवसेना भाजपमधील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या