Monday, November 18, 2024
Homeनगर2 कोटी 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

2 कोटी 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

उत्पादन शुल्कने महिनाभरात दाखल केले 391 गुन्हे

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभा आचारसंहितेच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारू विक्रीविरोधात महिनाभरात 391 गुन्हे दाखल करत 2 कोटी 33 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 396 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अवैध दारु विक्री, निर्मिती, वाहतूक व हातभट्टी दारुविक्री विरोधात अहिल्यानगर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी व भरारी पथकांनी 15 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत मोहीम राबविली.

- Advertisement -

या मोहिमेत 1 लाख 6 हजार 365 लीटर रसायन, 6 हजार 898 लीटर हातभट्टी, 1 हजार 289 लीटर देशी मद्य, 2 हजार 249 लीटर विदेशी मद्य, 18 हजार 304 लीटर बीअर, 1 हजार 505 लीटर ताडी जप्त करण्यात आली. या गुन्ह्यांत एकूण 56 वाहने जप्त करण्यात आली आहेत. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार सहआयुक्त प्रसाद सुर्वे, पुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर, अहिल्यानगर अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. नियमभंग करणार्‍या अनुज्ञप्तीधारकांवर देखील कडक कारवाई करण्यात येत आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या कारवायामध्ये सातत्य राहणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या