Thursday, November 14, 2024
Homeराजकीयकरोना महामारी रोखण्यात राज्य सरकार अपयशी - माजी मंत्री कर्डिले

करोना महामारी रोखण्यात राज्य सरकार अपयशी – माजी मंत्री कर्डिले

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

राज्यात करोना महामारी रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून रुग्णांना बेड मिळत नाहीत. हॉस्पिटलकडून रुग्णांची आर्थिक लूट होत आहे. देशाचे नेते शरद पवार सांगतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे कॅप्टन आहेत. कॅप्टन बाहेर फिरत नाहीत आणि त्यांना बाहेर फिरू देखील देत नाही. शरद पवार स्वत: या वयातही जिल्ह्या जिल्ह्यात फिरून राष्ट्रवादी वाढविण्याचे काम करत आहेत. यामागे शिवसेना संपविण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याची टीका माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली. दरम्यान, करोना महामारी रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचे सांगत त्यांनी सरकारवही हल्ला चढविला.

- Advertisement -

नगर तालुक्यातील खडकी, खंडाळा, हिवरे झरे, बाबुडी बेंद येथील 281 शेतकर्‍यांना खेळते भांडवलचे चेक वाटप कार्यक्रम खडकी येथील एडीसीसी बँकेच्या शाखेत झाला. माजी आ. शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते चेक वाटप करण्यात आले. यावेळी कर्डिले बोलत होते. अध्यक्षस्थानी भाऊसाहेब बोठे होते. कर्डिले म्हणाले, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्यावतीने नगर तालुक्यातील शेतकर्‍यांना पशुधनासाठी दोनशे कोटी रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कोरोनामुळे शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

नगर तालुक्यात दोनशे कोटी रूपायांचे कर्ज वाटप करणार

करोनामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी जिल्हा बँकेनेे कमी व्याजदरात शेतकर्‍यांना दहा हजार रुपयांपासून दीड लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. खडकी, हिवरे झरे, खंडाळा, बाबुडी बेंद येथील जवळपास तीनशे शेतकर्‍यांना तीन कोटी रूपायांचे खेळते भांडवल वाटप करण्यात आले. उरलेल्या 39 शाखांमधून पुढील आठवड्यात शेतकर्‍यांना कमी व्याज दराने कर्ज वाटप करणार आहोत. नगर तालुक्यात दोनशे कोटी रूपायांचे कर्ज वाटप करणार असल्याचे कर्डिले यांनी सांगीतले.

यावेळी बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, दिलीप भालसिंग, भाजप तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, दादा दरेकर, मोहन गहिले, उपसरपंच आण्णा चोभे, हरीभाऊ निकम, सुनिल कोठुळे, पंचायत समिती सदस्य दिपक कार्ले, हरीभाऊ बुलाखे, श्रीकांत कार्ले, गोरख कार्ले, जयप्रकाश पाटील, पंढरीनाथ कोठुळे, प्रंशात गहिले, गणेश भालसिंग, रावसाहेष कोठुळे, शुभम भांबरे, मेघराज कोठुळे, नानासाहेब बोरकर, ज्ञानदेव भोसले, बबन शिंदे, अशोक गव्हाणे, युवराज पडोळकर, बाळासाहेब पोटघन आदींसह शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या