मुंबई | Mumbai
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा १२ वा दिवस आहे. त्यांनी अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्टला उपोषण सुरु केले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. असे असले तरी जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहे. अशातच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. “राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय,” असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करत असून त्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. जरांगे पाटील यांनी सरकारकडून मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 12 वा दिवस आहे. त्यांनी अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टला उपोषण सुरु केले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे सरकारच्या गळ्यातील फास झाले आहेत, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. मनोज जरांगे पाटलांची लढाई आणि त्यांचा संघर्ष हा सत्ताधाऱ्यांच्या गळ्यातील फास बनला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा उपयोग सरकारसाठीचा संपला आहे. सरकारने त्यांच्या उपोषणाचा आणि लढ्याचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करुन घेतला आणि आता जरांगेंना वाऱ्यावर सोडले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 12 वा दिवस आहे. या काळात त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. हे अत्यंत अमानुष आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
पडसाद : आत्मविश्वास की वास्तवाशी फारकत?
दरम्यान, मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तसे स्पष्ट संकेत दिले होते. मनोज जरांगे आंदोलनावर ठाम असतील तर तो त्यांचा निर्णय आहे. शासनाकडून जे जे निर्णय करणे आवश्यक होते ते आपण केलेले आहेत. त्यात त्यांचे समाधान होत नाही. आपण प्रयत्न करत आहोत पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या मनात काही अजूनही प्रश्न असतील तर ते आपण सोडवतच आहोत. शेवटी मराठा समाजाच्या व्यापक हिताकरता आपण निर्णय करत आहोत. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा सुरू आहे. त्यात जरांगे पाटील समाधानी नाहीत. त्याच्यामुळे आता माझ्याकडे असा काही पर्याय नाही, ज्यामुळे मी त्यांचे समाधान करू शकेल, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले होते.




