Thursday, May 15, 2025
Homeधुळेराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले... काम पाहुनच उमेदवारी अन् पक्षाची जबाबदारी देणार

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले… काम पाहुनच उमेदवारी अन् पक्षाची जबाबदारी देणार

धुळे Dhule। प्रतिनिधी

- Advertisement -

प्रत्येक विधानसभा मतदार संघात (Assembly Constituency)कमीत कमी तीन हजार सक्रिय सभासदांची (active members) नोंदणी (Registration) करावी. नोंदणीसाठी कोणी किती व कसे काम (how much work done ) केले हे पाहुनच पुढील काळात उमेदवारी (Candidacy) व पक्षाची जबाबदारी (Responsibility of the party) दिली जाईल. त्यामुळे नाव नोंदणी मोहीम सक्रीयपणे राबवावी, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP state president Jayant Patil) यांनी केली. प्रसंगी त्यांनी महाविकास आघाडी सत्तेत नसली तरी जनतेची सहानुभुती महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) आहे. भाजप, शिंदे गटाकडून अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काल धुळे दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी भवनात आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी प्रत्येक पदाधिकार्‍याने किती सभासद नोंदणी केली याचा आढावा घेतला. तसेच गटबाजी करणार्‍यांचेही कान टोचले. सर्वांनी सर्वांना बरोबर घेतले पाहिजे. वाद मिटवावे. सत्कारापेक्षा कामावर लक्ष द्यावे. द्वेष करून जुन्या कार्यकर्त्यांनी प्रश्न निर्माण करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याप्रंसगी जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे व महानगराध्यक्ष रणजित भोसले यांनी आढावा सादर केला. सभासद नोंदणीसाठी केलेल्या उपाययोजनांची त्यांनी प्रदेशाध्यक्षांना माहिती दिली. तसेच पक्षाच्या माध्यमातून आगामी काळात करावयाच्या कामांचीही माहिती दिली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गटबाजी चव्हाट्यावर

राष्ट्रवादी भवनात बैठक सुरू असतांनाच पुन्हा एकदा अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. स्वागत फलकावर अनिल गोटे यांचा फोटो नसल्याने गोटे समर्थकांनी स्थानिक पदाधिकार्‍यांच्या विरोधात भवनाच्या आवारात घोषणाबाजी केली. यावेळी मनोज वाल्हे, सलीम शेख, डॉ. अनिल पाटील उपस्थित होते. तर अनिल गोटे हे प्रकृतीच्या कारणामुळे अनुपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : लग्नाच्या फोटोने केला घात; मैत्रिणीकडून भावाकरवी मित्राचा खून

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik मित्राने (Friend) लग्नाच्या वाढदिवसाचे (Birthday) फोटो व्हाट्स अॅप स्टेटसला अपलोड केल्याने संतापलेल्या मैत्रिणीने भावासह त्याच्या मित्रांकरवी मित्राचा घरात मारहाण (Beating)...