Monday, June 17, 2024
Homeमुख्य बातम्याठाकरे गटाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन; केली 'ही' मागणी

ठाकरे गटाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन; केली ‘ही’ मागणी

नाशिक | Nashik

- Advertisement -

देवळाली येथे १९ जानेवारीला सार्वजनिक पारावर झालेल्या सर्वपक्षीय शिवजयंती समितीच्या (Shiv Jayanti Committee) बैठकीत हिशेब मागितल्याच्या कारणावरून झालेल्या राड्यानंतर पालकमंत्र्यांच्या दबावाखाली तक्रार करणार्‍या माजी नगरसेवक भैय्या मणियार, सागर कोकणें यांच्यासह तिघांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी गंगाथरन डी (Collector Gangatharan D) यांना निवेदनाद्वारे करण्यात आली…

देवळाली गाव (Deolali village) येथील सार्वजनिक परावर झालेल्या सर्वपक्षीय शिवजयंती समितीच्या बैठकीत माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्याकडे मागील वर्षाचा हिशेब मागितला असता त्याचा राग येऊन लवटे यांनी सागर कोकणे व त्यांच्या कार्यकर्त्यांशी वाद घातला व शिवीगाळ केली यावेळी स्वप्निल लवटे यांनी सागर कोकणे यांच्या दिशेने गोळीबार (firing) करीत जीवे मारण्याची धमकीही दिली. लवटे व त्यांच्या साथीदारांकडे घातक शस्त्रेही होती.

या संपूर्ण घटनेचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद आहेत.असे असतांनाही या घटनेच्या तीन दिवसानंतर पोलिसांनी (Police) तक्रारकर्तेे सागर कोकणे, भैय्या मणियार, प्रशांत जाधव यांच्यावर खोटेे आरोप करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे हे कृत्य अत्यंत निषेधार्ह असेच आहे. कोणतेही पुरावे नसताना केवळ पालकमंत्र्यांच्या दबावाखाली पोलिस हे सर्व उद्योग करीत असल्याने या संपूर्ण प्रकरणाचे वरिष्ठांनी कसून चौकशी करावी आणि कोकणे, मणियार,जाधव यांच्याविरुद्धचे खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अशी विनंती जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान, दाखल केलेले खोटे गुन्हे मागे न घेतल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संंघटनेच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. या निवेदनावर माजीमंत्री बबन घोलप, उपनेते सुनील बागूल,सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी गटनेते विलास शिंदे, आ.नरेंद्र दराडे, माजी आमदार योगेश घोलप, बाळासाहेब कोकणे, महेश बडवे,बाळा दराडे आदींच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या