Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रUdyog Rattan Award : राज्याचा पहिला ‘उद्योग रत्न’ पुरस्कार रतन टाटा यांना...

Udyog Rattan Award : राज्याचा पहिला ‘उद्योग रत्न’ पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर!

मुंबई । Mumbai

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जातो. याच धर्तीवर महाराष्ट्र शासन उद्योगरत्न पुरस्कार सुरू करणार असून याचा पहिला पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती ‘रतन टाटा’ यांना जाहीर झाल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

- Advertisement -

उदय सामंत म्हणाले की, उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्रई एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उद्योगमंत्री म्हणून आपला समावेश असलेल्या समितीची बैठकीत निर्णय घेण्यात आला. देशात मानाचा व प्रतिष्ठेचा ठरले असा हा पुरस्कार असेल. उद्योगरत्न पुरस्काराबरोबरच युवा उद्योजक, महिला उद्योजक आणि मराठी उद्योजकासाठी आणखी तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी सांगितली.

रतन टाटा हे टाटा समूहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांना उद्योग आणि व्यापार क्षेत्रात चांगल्या कामगिरीसाठी २००० मध्ये भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. त्यांच्याकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मानद डॉक्टरेट आहे. नोव्हेंबर २००७ मध्ये फॉर्च्यून मासिकानं त्यांना व्यवसायातील २५ सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक असल्याचं जाहीर केलं होतं. मे २००८ मध्ये टाटा यांचा समावेश टाइम मासिकाच्या २००८च्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता. रतन टाटा यांना याआधी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे, त्यांना देशातील दुसरा सर्वोच्च सन्मान ‘पद्मविभूषण’ देखील मिळालेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या