Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशRBI च्या 'त्या' निर्णयानंतर शेअर बाजारात हजारो कोटींचा चुराडा

RBI च्या ‘त्या’ निर्णयानंतर शेअर बाजारात हजारो कोटींचा चुराडा

मुंबई | Mumbai

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात (Repo Rate) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

त्यानुसार आता रेपो दर ४ टक्क्यांवरून वाढवून ४.४० टक्के करण्यात आला आहे. RBI च्या या घोषणेनंतर शेअर बाजारात (Stock Market) मोठी पडझड पाहायला मिळाली.

RBI च्या या निर्णयामुळे काही मिनिटात शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या हजारो कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. सेन्सेक्समध्ये (Sensex) तब्बल १४०३.१३ अंकांची म्हणजेच २.४६ टक्क्यांची घसरण झाली. तर निफ्टीमध्ये (Nifty) ४३९.७० अंकांची म्हणजेच २.५८ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.

- Advertisment -

ताज्या बातम्या