Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यासाठी 'इतक्या' टन रासायनिक खतांचा साठा मंजूर

जिल्ह्यासाठी ‘इतक्या’ टन रासायनिक खतांचा साठा मंजूर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आगामी खरीप हंगामासाठी केंद्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुमारे 43 लाख 31 हजार पाचशे मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर केले आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी दोन लाख 22 हजार 860 मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केला आहे तर एक लाख 27 हजार 820 न्यानो युरियाचा साठा मंजूर करण्यात आला आहे. हा खत साठा एप्रिल ते सप्टेंबर या काळात टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे…

- Advertisement -

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच रासायनिक खते खरेदीला सुरुवात झालेली आहे.पुणे येथे झालेल्या बैठकीत कृषी आयुक्तालयाने राज्यातील सर्व जिल्ह्यांकरिता रासायनिक खताचा कोटा नुकताच मंजूर केला आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये केंद्र सरकारच्यावतीने खत परिषदेचे विभागीय आयोजन करण्यात येते. त्यामध्ये हा सर्व आढावा घेऊन आवंटन मंजूर करण्यात येते.

सुप्रिया सुळे म्हणतात, १५ दिवसांत दिल्ली अन् महाराष्ट्रात दोन राजकीय स्फोट…

नाशिक जिल्ह्याकरिता दोन लाख 22 हजार 860 मेट्रिक टन ,नंदुरबार जिल्ह्याकरिता 87,990 मेट्रिक टन, जळगाव जिल्ह्यासाठी तीन लाख पाच हजार एकशे चाळीस मॅट्रिक टन, अहमदनगर जिल्ह्यासाठी दोन लाख 16 हजार 510 मेट्रिक टन तर धुळ्यासाठी 94,380 मेट्रिक टन साठा मंजूर झालेला आहे. मंजूर करण्यात आलेल्या खताचा कोटा हा एप्रिल, मे, जून, जुलै,ऑगस्ट व सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने दरमहा प्रत्येक जिल्ह्याला देण्यात येणार आहे.

रब्बी हंगामा आता संपुष्टात आलेला आहे तर खरीप हंगामाची पूर्वतयारी आता सुरू होणार आहे. खरीप आणि रब्बी हंगामात मध्ये विविध राज्यांकडून मागील वर्षी रासायनिक खतांची मागणी व त्यातून उरलेले रासायनिक खत आणि उपलब्ध शिल्लक खत साठा यांचा विचार करून खरीप हंगामासाठी खतांचा कोटा मंजूर करण्यात येतो.

त्यानुसार चालू वर्षातील खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्य करिता 43 लाख 13 हजार पाचशे मीटर खतांचा साठा केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे.या खतांमध्ये युरिया ८९, १७०, डीएपी १९,१३०, एमओपी 3,660, एनपीके 83 हजार 870 आणि एस एस पी 27 हजार 30 असा एकूण दोन लाख 22 हजार आठशे साठ मीटर खतांचा यामध्ये समावेश आहे.

Video : १३ दिवस उलटूनही आंदोलन सुरूच; सहाय्यक निबंधकांसमोर शेतकरी आक्रमक

पुढील सहा महिन्यात उपलब्ध होणाऱ्या खताचे आवटन विचारात घेऊन राजाच्या कृषी विभागाने प्रत्येक जिल्ह्याच्या खताचा वापर विचारात घेऊन सर्व प्रकारच्या खतांच्या आवर्तन प्रत्येक जिल्ह्यासाठी मंजूर केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सव्वा लाख नॅनो युरिया

युरियाची मोठ्या प्रमाणात मागणी राहत असल्यामुळे व तो खरीप हंगामात सहजगत्या शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून न्यानो युरियाची निर्मिती व त्याच्या वापरासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना हा युरिया वापरण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यासाठी नॅनो युरिया हा एक लाख 27 हजार 820 मीटर मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये ऑगस्ट महिन्यात एप्रिल महिन्यात 4410 मेट्रिक टन,मे महिन्यात २५१९० मेट्रिक टन, जून महिन्यात 34,000 मेट्रिक टन, जुलैमध्ये 45 हजार 330 मेट्रिक टन, ऑगस्ट महिन्यात 12,590 मेट्रिक टन तर सप्टेंबर महिन्यात 6300 मेट्रिक टन असा एकूण एक लाख 27 हजार 820 मेट्रिक टन नॅनो युरियाचा साठा उपलब्ध होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या