Friday, May 3, 2024
Homeनाशिक...अन् त्यांच्या डोळ्यात आले आनंदाश्रू

…अन् त्यांच्या डोळ्यात आले आनंदाश्रू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भद्रकाली पोलीस ठाण्याच्या (Bhadrakali Police Station) हद्दीत बंद घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने चोरी (Theft) करणाऱ्यास अटक (Arrested) करून न्यायालयाच्या आदेशाने दागिने फिर्यादीला सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना (Dipali Khanna) यांच्या हस्ते परत देण्यात आले…

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी जनसिंग मोहन ससाणे (Jansingh Mohan Sasane) (५१, रा. रूम नं. बी. २९, ५४ क्वार्टर, कथडा, नाशिक) यांच्या बंद घराचे अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडले.

अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून घरातील ९५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरून वपोनी दत्ता पवार (Datta Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाच्या पोलिसांना (Police) मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शिवाजी चौक, कथडा, जुने नाशिक येथे सापळा रचण्यात आला.

संशयित हानी फुलमचंद बरेलीकर (२८ , रा. संतरोहिदास समाज मंदीराजवळ, शिवाजीचौक, भद्रकाली नाशिक), किशोर बाबुराव वाकोडे (२० , रा. भगवतीनगर, कोळीवाडा, भद्रकाली नाशिक) यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांची विचारपूस केली असता त्यांच्यासोबत आणखी दोन साथीदार सागर टाक (रा. ५४ क्वार्टर, भद्रकाली, नाशिक) व एक विधीसंघर्षीत बालक असे असल्याचे संशयितांनी सांगितले.

संशयितांकडून गुन्हयातील मुद्देमाल ७५ हजार रुपये किंमतीचे ०५ किलो चांदीचे मिश्रीत धातू असलेले त्यात देवीचे मुकूट, छत्री व कमरपट्टा, १२ हजार रुपये किंमतीचे ०१ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, २ ग्रम वजनाची एक सोन्याची तार, असा एकूण ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

न्यायालयाच्या आदेशाने हा मुद्देमाल सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वपोनी दत्ता पवार यांच्या उपस्थितीत ससाणे यांना परत देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या