Sunday, September 22, 2024
Homeक्राईमराहुरी पोलिसांनी केल्या चोरीच्या 11 मोटारसायकली हस्तगत

राहुरी पोलिसांनी केल्या चोरीच्या 11 मोटारसायकली हस्तगत

बनावट नंबर प्लेट बनवून देणाराही गजाआड

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राहुरी पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. याप्रकरणी गुन्हे शोध पथकाने चार जणांच्या टोळीला गजाआड केले असून या टोळीकडून चोरीच्या 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राहुरी येथील गुन्हे शोध पथक या दुचाकी चोरांचा शोध घेत असताना तपासा दरम्यान पथकाला मिळालेले सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय खबर्‍या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, धर्मराज पाटील, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, पोलीस नाईक प्रविण बागुल, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सचिन ताजणे, गोवर्धन कदम, जयदीप बडे, अजिनाथ पाखरे, सतीश कुर्‍हाडे, अंकुश भोसले, संदीप ठाणगे, श्रीरामपूरचे मोबाईल सेलमधील पोलीस नाईक सचिन धनाड, संतोष दरेकर आदी पथकाने दोन संशयितांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्या आणखी एका साथीदाराची माहिती दिली. त्यानुसार पोलीस पथकाने बनावट नंबर प्लेट बनवून देणार्‍या रेडियम दुकानदारासह चार आरोपींना ताब्यात घेऊन गजाआड केले. तसेच त्यांच्याकडून एकूण 11 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. आरोपी नावेद इब्राहिम शेख, वय 23 वर्षे, रा. जातप, ता. राहुरी, मंगेश विष्णू ठाकर, वय 22 वर्षे, रा. सोमय्या फार्म, ता, राहुरी, किशोर अंकुश पवार, वय 19 वर्षे, रा. उंदीरगाव, ता. श्रीरामपूर, नावेद इब्राहिम शेख, वय 23 वर्षे, रा. जातप, ता. राहुरी, या चार जणांना गजाआड केले. तसेच बनावट नंबर प्लेट बनवून देणारा रेडियम दुकानदार जावेद रज्जाक शेख, रा. संक्रापूर, ता. राहुरी, यालाही आरोपी करून गजाआड केले. पुढील तपास सहाय्यक फौजदार आहेर करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या