Friday, September 20, 2024
Homeनगरस्टोन क्रेशरसाठी 18 लाखांची वीज चोरी

स्टोन क्रेशरसाठी 18 लाखांची वीज चोरी

भरारी पथकाचा छापा || गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर तालुक्यातील कामरगाव शिवारातील सुदर्शन स्टोन क्रेशरसाठी 18 लाख 12 हजार 454 रूपये किंमतीची 99 हजार 153 युनिट वीज चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्टोन क्रेशरच्या मालकाविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात विद्युत कायदा कलम 2003 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषीकेश महादेव कोटकर (वय अंदाजे 34, रा. कामरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या स्टोन क्रेशर मालकाचे नाव आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भरारी पथक कल्याण दोनचे प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता देवेंद्र ज्ञानदेव नलावडे (वय 40) यांनी फिर्याद दिली आहे. कामरगाव शिवारातील सुदर्शन स्टोन क्रेशरसाठी वीज चोरी होत असल्याच्या संशयावरून नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने 5 एप्रिल रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास छापा टाकला. तेथे केलेल्या तपासणीदरम्यान गेल्या 23 महिन्यांत (एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2024) स्टोन क्रेशरसाठी एकूण 18 लाख 12 हजार 454 रुपये किंमतीची 99 हजार 153 युनिट वीज चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. यासंदर्भात स्टोन के्रशर मालक कोटकर यांना कळविण्यात आले व त्यांच्याविरूध्द बुधवारी (19 जून) नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार शिंदे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या