Friday, May 3, 2024
Homeनाशिकमालेगाव शहरातील अवैध धंदे बंद करा : विधायक संघर्ष समिती

मालेगाव शहरातील अवैध धंदे बंद करा : विधायक संघर्ष समिती

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहर-परिसरात अवैध धंदे (Illegal business) जोरात सुरु असून गुटखा (Gutkha), गावठी दारू, कुत्ता गोळी, बॉण्ड, गांजा, भांग आदी नशेसाठी वापरली जाणारी अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

- Advertisement -

त्यामुळे समाजातील मोठा घटक व्यसनाधीन होत असून ऑनलाईन लॉटरी (Online lottery) देखील अनेकांचे संसार उध्वस्त करणारी ठरली असली तरी पोलीस यंत्रणा (Police system) या अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरली आहे. राजकीय दबावामुळेच कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याने अवैध धंदे शहरात फोफावले असल्याचा आरोप करीत आम्ही मालेगावकर संघर्ष समितीतर्फे (sangarsha samiti) नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धरणे आंदोलन (agitation) छेडण्यात आले.

राज्य सरकारने (state government) कायदा करून बंद केलेला गुटखा राजरोसपणे विक्री होत असतांना यावर खरंच बंदी आहे की काही माफियांना आर्थिक मदत व्हावी म्हणून ती गुटखा बंदी लागू केली गेली आहे? हा प्रश्न निर्माण होतो. प्रशासन राजकीय दबावाला बळी पडून अवैध धंदेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्यास टाळत आहेत. त्यामुळे उच्चभ्रू वस्तीमध्ये जुगार अड्डे सुरू करण्यापर्यंत अवैध व्यावसायिकांची मजल गेली असल्याचा आरोप निखिल पवार यांनी यावेळी बोलतांना केला.

शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत या मागणीसाठी मोसमपुलावरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर (Mahatma Gandhi statues) 1 जानेवारीस संघर्ष समितीतर्फे धरणे आंदोलन छेडण्यात येवून प्रशासन यंत्रणेतर्फे अवैध धंद्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल तीव्र स्वरूपात असंतोष व्यक्त केला गेला.

नशेसाठी वापरल्या जाणार्‍या कुत्ता गोळी, बॉण्ड, गांजा, भांग आदी वस्तुंची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्यामुळे शहरातील युवक मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असल्याचे चित्र अनेक घटनांवरून उघडकीस आले आहे. असे असले तरी या धंद्यांविरूध्द कारवाई करण्याचे धाडस अधिकारी दाखवत नसल्याबद्दल सार्वजनिक नागरीक सुविधा समितीचे (Public Civic Facilities Committee) अध्यक्ष रामदास बोरसे (ramdas borse) यांनी खंत व्यक्त केली.

भ्रष्टाचाराने (Corruption) ज्यांचे हात बरबटले आहेत ते अधिकारी कारवाई करूच शकत नाही. वरिष्ठ अधिकारी भेट देतात तेव्हा अवैध धंदे बंद होतात. नंतर मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे होत, असा आरोप बोरसे यांनी केला. मोठ्या प्रमाणात चालू असलेले जुगार अड्डे कोणाच्या राजकीय आशीर्वादाने चालू आहेत? असा सवाल विवेक वारुळे यांनी उपस्थित करत प्रशासन यंत्रणेच्या कारभाराचे वाभाडे काढले.

शहरातील अवैध धंदे कठोरतेने बंद करावेत या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे आंदोलन स्थळावरून तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी भेट देऊन स्वीकारले. यावेळी देवा पाटील, संजय जोशी, अन्सारी अहमद रजा, सुशांत कुलकर्णी, कुंदन चव्हाण, शेखर पगार, अनिल महाजन, दादा बहिरम, गोपाळ सोनवणे, राजाराम पाटील, प्रदीप पहाडे, कपिल डांगचे, जयेश ब्राम्हणकर, दिनेश पाटील, नेविलकुमार तिवारी, तुषार पाटील, तुषार जगताप, भूषण कचवे, शरद शिंदे, सुनील चांगरे आदींसह मोठ्या संख्येने शहरातील नागरीक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या