Saturday, July 27, 2024
Homeनाशिक'नो हेल्मेट नो पेट्रोल'ची कडक अंमलबजावणी

‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ची कडक अंमलबजावणी

जुने नाशिक | Nashik

“नो हेल्मेट नो पेट्रोल धोरण’ (No Helmet No Petrol) अंमलबजावणी सुरू आहे. मुंबईनाका पोलीस ठाणे (Mumbai naka Police Station) हद्दीतील पेट्रोल पंपांवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाळ (Senior Police Inspector Vijay Dhamal) फिरून आढावा घेत आहे….

- Advertisement -

दरम्यान काल स्वातंत्र्य दिनाचे (Independence Day) औचित्य साधत नाशिक शहरामध्ये (Nashik City) नो हेल्मेट, नो पेट्रोल मोहिमेला सुरुवात करण्यात आली. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

मागील ०५ वर्षात ७८२ अपघातात (Accident) ८२५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी ४६७ दुचाकीस्वार असून त्यापैकी ३९७ जणांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अपघातामुळे जीव वाचवण्यासाठी हा उपक्रम स्तुत्य आहे.

नागरिकांचा जीव वाचवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले. मात्र सर्व नियमांचे पालन करुन नागरिकांनी ही मोहिम यशस्वी करायला हवी. यासाठी सर्व पेट्रोल पंपावर सीसीटिव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसवण्यात येणार असून हेल्मेट न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या