Sunday, May 19, 2024
Homeधुळेधुळ्यात तीन सट्टापिढी मालकांसह 14 जुगारी ताब्यात

धुळ्यात तीन सट्टापिढी मालकांसह 14 जुगारी ताब्यात

धुळे : प्रतिनिधी dhule

शहर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधिक्षक एस.ऋषीकेश रेड्डी यांनी आज दुपारी मनोहर चित्रमंदीर समोर, पाच कंदील येथील फुड मार्केट, देवपुरातील नेहरु चौकाजवळ व शाळा क्र.९ च्या मागे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर अचानक छापे टाकत कारवाई केली. तीन सट्टापिढी मालकांसह जुगार खेळणाऱ्या 14 जणांना रंगेहात पकडण्यात आले.

- Advertisement -

त्यांच्याकडून रोकडसह 16 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. धुळे शहर पोलीस ठाणे हद्दितील आग्रा रोडवरील मनोहर टॉकीजसमोर सार्वजनिक जागी जुगार खेळतांना दोन जण मिळुन आले. त्यात सट्टा पिढी मालक मनोज गवळी याचाही समावेश आहे. त्यांच्याकडून मिलन नावाचा अंकसट्टा जुगाराची साधने व रोख ८ हजार ४० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. तसेच पाचकंदील येथील फुड मार्केट येथे जुगार खेळतांना ५ जण मिळुन आले. त्यांचेकडे मिलन नावाचा अंकसट्टा जुगाराची साधने व ५ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल, मोबाईल मिळुन आला. सट्टा पिढी मालक गणेश सोनार हा फरार आहे.

या बरोबरच आझादनगर पोलीस ठाणे हद्दित 9 नंबर शाळेच्या मागे दोन जुगारी मिळुन आले. यात सट्टा पिढी मालक राहुल शिंदे याचा समावेश आहे. त्यांच्या ही जवळ मिलन नावाचाअंकसट्टा जुगाराची साधने व १ हजार ६७० रुपये रोख असा मुद्देमाल मिळुन आला. तसेच देवपुर पोलीस स्टेशन हद्दितील नेहरु चौकाजवळ सार्वजनिक जागी जुगार खेळणाऱ्या दोन जणांना पडकण्यात आले. यात सट्टा पिढी मालक पिंटु चौधरी याचा समावेश आहे. त्यांच्याकडे मिलन नावाचा अंकसट्टा जुगाराची साधने व १ हजार ३६० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. चारही कारवाई मिळुन एकुण१६ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच एकुण १४ आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असुन सट्टा पिढी मालकांवर स्थानिक गुन्हे शाखा येथे प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर या कारवाईबाबत धुळे शहर, आझादनगर, देवपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक एस ऋषीकेश रेड्डी, सपोनि संगिता राऊत, पोसई दत्तात्रय उजे, हेकॉ, कबीर शेख, चंद्रकांत जोशी, मंगा शेमले, रमेश उघडे, सुधिर सोनवणे, प्रविण नागरे, पोना नरेंद्र पवार, पोकॉ विवेक वाघमोडे, पोकॉ प्रशांत पाटील, धोंडीराम गुट्टे, मयुर पाटील, कर्नलबापु चौरे यांच्या पथकाने केली आहे. धुळे शहरात काही अवैध धंदे सुरु असल्यास त्याबाबत आम्हास माहीती कळवावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल व संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या