Friday, May 31, 2024
Homeजळगावविद्यार्थीनींनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ.हर्षणा पाटील

विद्यार्थीनींनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ.हर्षणा पाटील

बोदवड Bodwad प्रतिनिधी :

स्रीला निसर्गाची लाभलेली ही अनमोल देणगी आहे. नवनिर्मितीचे वरदान (gift of innovation) लाभलं आहे. याचा आदर समाजातील प्रत्येकाने केलाच पाहिजे. मासिक पाळी विषयी (About menstruation) आजही सर्वत्र बोलणे टाळत राहतात. आपण या विषयावर आपलेपणाने बोलत नाही. या संबंधातील समाजाची मानसिकता (Society mentality) बदलणे अतिशय गरजेचे आहे. गांभीर्यपूर्णपणे या विषयाकडे आज आपण बघितलं पाहिजे. आपल्या शरीरात होणारे बदल ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. स्त्रीला टाळण्यासाठी किंवा दुय्यम स्थान देण्यासाठी समाजाने ही धारणा निर्माण केलेली आहे. आणि त्यातच समाज गुरफटून गेलेला आहे.त्याला वेगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून (scientific approach) बघणे गरजेचे आहे. समाजात आजही अंधश्रद्धा आणि गैरसमज (Superstitions and misconceptions) मोठ्या प्रमाणात आहेत. असे प्रतिपादन डॉ.हर्षणा पाटील यांनी केले.

- Advertisement -

कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड येथे मुलींचे वसतिगृह समिती आयोजित,” विद्यार्थीनींच्या आरोग्य विषयक समस्या” या विषयावर आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य अरविंद चौधरी यांनी केले.

उद्घाटनपर मार्गदर्शनामध्ये प्राचार्य अरविंद चौधरी सांगितले की, महिला आणि मुली आपल्या समस्या बोलत नाहीत,सतत दुखणे अंगावर काढतात. त्याचा परिणाम असा होतो की, अंगावर दुखणे बळावत जाते.आणि उघडपणाने महिला आजही समाजातील या मासिक पाळी विषयी चर्चा करत नाही. ते सांगणे गरजेचे आहे.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. हर्षणा पाटील यांनी ” विद्यार्थीनींच्या आरोग्य विषयक समस्या” या विषयासंबंधी अतिशय शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, मासिक पाळी या प्रक्रियेला आपण गर्भाशयातले अश्रू देखील म्हणू शकतो. त्याला गर्भाचं अस्तर असतं आणि म्हणून त्याला अशुद्ध रक्त म्हणू नये. मुलींच्या शरीरात रक्त हे अशुद्ध नसतेच. हे आधी समाजाने समजून घेतले पाहिजे. पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

यावेळी बऱ्याच विद्यार्थिनींनी प्रश्न विचारले व त्याचे निराकरण ग्रामीण व शहरी महाविद्यालयातील विद्यार्थिनी व महिला त्यांच्या समस्या व घ्यावयाची काळजी या विषयावर त्यांनी पीपीटी च्या माध्यमातून वैज्ञानिक पद्धतीने व शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती दिली.

यावेळी डॉ. हर्षणा पाटील यांनी सांगितले की,मासिक पाळी मध्ये पॅड किंवा कपडा यांचा वापर न करता आज उपलब्ध असलेल्या आधुनिक साधनांचा उपयोग आपण कशा पद्धतीने करू शकतो. तसेच त्यांचा वापर आपण कोणत्या पद्धतीने करावा. अंगावर जर जास्त रक्त जात असेल त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जास्त पोट दुखत असल्यामुळे ओरोमा थेरपीचा वापरही करावा,तसेच या पाच दिवसात हलका आहार घ्यावा व थोडासा व्यायामही केल्यास आपल्याला बरे वाटते. वेलची,मोरवळा,बेलाचा काढा गरजेनुसार घेतल्यास आपल्याला बरे वाटेल. मासिक पाळीचे चक्र कसे असते हे यावेळी समजावून सांगितले . मासिक पाळीच्या दरम्यान अंतर्वस्र नियमित बदलणे गरजेचे आहे. तसेच अंतरभागाची स्वच्छता सुद्धा या कालावधीत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले

चर्चासत्र समन्वयक व मुलींचे वसतिगृह अधीक्षक डॉ.रत्ना जवरास यांनी प्रास्ताविक व भूमिका मांडताना सांगितले की, आज मासिक पाळी हा विषय समस्या म्हणून मनात न ठेवता अधिक खुलेपणाने मुलींनी पालकांशी बोलायला पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या आहारात बदल करणे गरजेचे आहे. मुलींनी अधिक उघडपणे या विषयावर बोलायला पाहिजे.हीच या कार्यक्रमाची प्रमुख भूमिका यावेळी डॉ.रत्ना जवरास यांनी मांडली.

सूत्रसंचालन डॉ.वंदना नंदवे यांनी केले,तर आभार प्रदर्शन श्रीमती कंचन दमाडे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या