नाशिक | Nashik
फुग्यांची-फुलांची आकर्षक सजावट करुन बँड पथकाच्या तालावर पुष्पवृष्टीचा वर्षाव करत पारंपारिक पद्धतीने बैलगाडीवर बसवून मिरवणुकीने (Procession) आज नवागतांचे शाळेत (School) स्वागत करण्यात आले.
आजपासून शाळा सुरु झाल्या असून शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय होण्यासाठी आज जिल्हाभर प्रवेशोत्सव साजरा झाला. त्यासाठी अधिकारी, संपर्क अधिकारी हजर होते. यावेळी शाळेत आलेल्या बालकांचे (Children) पायाचे ठसे घेण्यात आले. तसेच त्यांना पेढे आणि लाडू भरविण्यात आले.
हे देखील वाचा : Nashik News : चार बारचे परवाने महिनाभरासाठी निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना (Students) पुस्तकेही देण्यात आली. तसेच स्वागतासाठी शैक्षणिक होडी देखील तयार करण्यात आली होती. याशिवाय हसर्या फुलांचे सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते. तर छोटीशी भेट देऊन औक्षण करत शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची सुरुवात आनंददायी झाली. पहिल्या दिवसाचे हे आनंदायी वातावरण पाहून विद्यार्थ्यांना शाळेची गोडी वाटल्याशिवाय राहणार नाही, असे वातावरण आज होते. त्यामुळे आपल्या बालकांचे असे भव्य स्वागत पाहुन पालकही भारावून गेले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा