Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशप्रवेश रद्द करणार्‍या विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क मिळणार परत

प्रवेश रद्द करणार्‍या विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क मिळणार परत

नवी दिल्ली –

पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या एखाद्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश रद्द केला तर विद्यापीठांनी

- Advertisement -

अशा विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क परत करावेत, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीने दिले आहेत. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिंळाला आहे.

30 नोव्हेंबरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत. त्यांना या आदेशानुसार संपूर्ण शुल्क परत मिळणार असून जे विद्यार्थी 31 डिसेंबरपर्यंत प्रवेश रद्द करतील, त्यांना एक हजार रूपये प्रोसेसिंग फी कापून बाकीची रक्कम परत मिळेल.

करोना संकट तसेच इतर काही कारणांमुळे असंख्य पालकांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने वरील निर्णय घेतला असून तो केवळ चालूवर्षी लागू राहणार असल्याने युजीसीने स्पष्ट केले आहे.

शुल्क परत करण्याचा निर्णय सर्व विद्यापीठांना लागू असणार आहे. काही पालक व विद्यार्थ्यांनी शुल्क परत केले गजात नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जी विद्यापीठे हा आदेश पाळणार नाहीतर, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही युजीसीने आपल्या आदेशात नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या