नांदुरी | वार्ताहर Nanduri
- Advertisement -
कळवण तालुयातील साकोरेपाडा गावात उपसरपंच असलेल्या एकाने मद्याच्या नशेत आपल्या पत्नीचा कुर्हाडीने घाव करून खून केल्याची घटना घडली आहे.
साकोरेपाडा येथील उपसरपंच जयराम महारु पवार आणि त्यांची पत्नी जिजाबाई जयराम पवार यांच्यात दारूच्या व्यसनावरून वारंवार वाद होत होते. २९ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा दोघांमध्ये कडायाचे भांडण झाले. त्यानंतर जयराम याने पतीने पत्नीवर हल्ला करून तिचा खून केला.
घटनेनंतर जयराम पवार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्या मात्र पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.





