Friday, November 22, 2024
Homeनगरविहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश

विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला तब्बल वीस तासांनंतर यश आले आहे. जंगलात फिरणारे बिबटे गेल्या काही वर्षांपासून नागरी वस्तीमध्ये फिरताना दिसत आहे. संगमनेर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबटे फिरताना दिसत आहेत. दरम्यान, गुंजाळवाडी परिसरातील वेल्हाळे रस्त्यावरील काशी विश्वेश्वर मंदिराजवळ नामदेव गुंजाळ यांच्या शेतामधील विहिरीमध्ये एक बिबट्या शनिवारी रात्री अचानक पडला.

- Advertisement -

भक्ष्याच्या शोधामध्ये हा बिबट्या फिरत असताना त्याला विहिरीचा अंदाज आला नाही. पाणी असलेल्या विहिरीमध्ये तो अडकला. सदर बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती समजल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर काही नागरिकांनी वन विभागाच्या अधिकार्‍यांना माहिती दिली. त्यावर तत्काळ वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि तब्बल वीस तासांनंतर रविवारी सायंकाळी बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले. या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या