धुळे – प्रतिनिधी dhule
शिरपूर (shirpur) तालुक्यात विविध पिकांच्या आड सुरु असलेल्या गांजा शेती विरोधात शिरपूर तालुका पोलिसांनी (police) कारवाई मोहीम सुरु केली आहे. त्यातर्गत लाकड्या हनुमान शिवारातील काल आणखी एका गांजा शेतीवर पोलिसांनी छापा टाकत नांगर फिरविला. शेतातून एकुण तीन लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.
Breaking news तापी नदीत ट्रक कोसळला ; चालकाचा शोध सुरू, सहचालक बचावलाVideo तापी नदीत असा कोसळला ट्रक…
याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद झाला आहे. लाकडया हनुमान येथील शिवाजी फेका वळवी हा त्यांच्या कसत असलेल्या शेतात प्रतिबंधीत असलेला मानवी मेंदूस परिणाम करणाऱ्या गांजा सदृश्य अंमली पदार्थाच्या वनस्पतीच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड केलेली आहे, अशी खात्रीशीर माहिती काल सपोनि सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह लाकडया हनुमान गावशिवारातील शेतात शिवाजी वळवी हा कसत असलेल्या शेताचा शोध घेत छापा टाकला.
Breaking news तापी नदीत ट्रक कोसळला ; चालकाचा शोध सुरू, सहचालक बचावलाVideo तापी नदीत असा कोसळला ट्रक…
शेतात कापुस व तुरीच्या झाडांमध्ये ठिकठिकाणी गांजाची 5 ते 6 फुट उंचीचे एकुण 176 झाडे आढळून आली. त्यावर नांगर फिरवीत एकुण 3 लाख 3 हजार 200 रुपये किंमतीची 151 किलो 600 ग्रॅम वजनाची गांजा सदृश्य अंमली पदार्थाची झाडे जप्त करण्यात आली. पोकॉ योगेश मोरे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजी वळवीवर शिरपुर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Breaking news तापी नदीत ट्रक कोसळला ; चालकाचा शोध सुरू, सहचालक बचावला
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड (Superintendent of Police Sanjay Barkund), अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय सुरेश शिरसाठ, पीएसआय संदीप पाटील, भिकाजी पाटील, एएसआय कैलास पाटील, पोहेकॉ पवन गवळी, खसावद, जगदीश मोरे, पोना आरीफ पठाण, शिंदे, परशुराम पवार, पोकॉ रोहिदास पावरा, गायकवाड, जयेश मोरे, योगेश मोरे, सईद शेख, मनोज पाटील यांच्या पथकाने केली आहे.
Video तापी नदीत असा कोसळला ट्रक…