Sunday, February 1, 2026
HomeनाशिकDindori : रोहित पवार यांच्याकडून पवार समर्थक सुदाम बोडके कुटुंबियांचे सांत्वन

Dindori : रोहित पवार यांच्याकडून पवार समर्थक सुदाम बोडके कुटुंबियांचे सांत्वन

दिंडोरी | Dindori

अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती अकाली निधनानंतर दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथील शरद पवार अजित पवार यांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते सुदाम बोडके हे शोक मग्न होत त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी ढकांबे येथे बोडके यांचे घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले सर्व कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली त्यांचे इंजिनिअर मुलाचे नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले.

- Advertisement -

अजित दादांचे निधनाचं दुःखच एवढं मोठं होतं की हा धक्का अनेकांना सहन होण्यापलीकडचा होता. असाच धक्का पवार साहेब आणि अजितदादा यांच्यावर प्रेम करणारे आणि राष्ट्रवादी परिवार एकत्र राहिला पाहिजे अशी तीव्र इच्छा असलेले त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते सुदाम बोडके यांना बसला त्यांचे जाण्याचे पक्षाचे व कुटुंबाचाही आधार गेला आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत असे रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी सांगितले.. यावेळी माजी आमदार सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, कोंडाजीमामा आव्हाड, नगरसेवक कमलेश बोडके, हेमंत धात्रक, युवा नेते फहाद अहमद, रविकांत वरपे, पुरुषोत्तम कडलग, नरेश देशमुख, दिनेश धात्रक यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

YouTube video player

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1550 रुपये भाव मिळाला. कांद्याची 5216 गोण्यांची आवक झाली. कांदा...