Monday, September 23, 2024
Homeमुख्य बातम्यानागपूरमध्ये भाजपला 'जोर का झटका'; मविआचे सुधाकर अडबाले विजयी

नागपूरमध्ये भाजपला ‘जोर का झटका’; मविआचे सुधाकर अडबाले विजयी

नागपूर | Nagpur

- Advertisement -

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी ८ वाजता नागपूर शहरातील अजनी रेल्वेचे समुदाय भवन येथे सुरुवात झाली. चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत मविआचे सुधाकर अडबाले यांनी भाजपचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव करत विजय मिळवला आहे…

नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणी केंद्रावर गोंधळ

पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४, हजार ७१ तर गाणार यांना ६ हजार ३०९ मते मिळाली. एकूण ७ हजारांहून अधिक मतांनी अडबाले आघाडीवर होते. पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करीत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा अद्याप बाकी आहे.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन; ‘या’ उपोषणामुळे आले होते राज्यभर चर्चेत

दहा वर्षांपासून भाजपकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली. भाजपने गाणार यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, फडणवीस, गडकरी यांनी त्यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. दरम्यान, पहिल्या फेरीत अडबाले यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. विजयाच्या औपचारिक घोषणे आधीच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या