Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजऐन सणासुदीच्या दिवसांत साखरेच्या दरवाढीने गोडवा महागला; किरकोळ बाजारात ७० रुपये किलोपर्यंत

ऐन सणासुदीच्या दिवसांत साखरेच्या दरवाढीने गोडवा महागला; किरकोळ बाजारात ७० रुपये किलोपर्यंत

नाशिक | प्रतिनिधी
श्रावण महिन्यात रक्षाबंधनापासून सुरू होणारा सणांचा उत्साह गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीपर्यंत कायम राहणार असताना साखरेच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सणासुदीच्या काळात घरगुती गोडधोड, मिठाई तसेच विविध खाद्यपदार्थांसाठी साखरेची मागणी वाढत असते. मात्र, गेल्या काही दिवसांत साखरेच्या दरा झालेल्या मोठ्या वाढीमुळे यंदा सणांचा गोडवा महागण्याची शक्यता आहे.

सुमारे २१ ते २२ दिवसांपूर्वी साखरेचा दर ४ हजार १०० ते ४ हजार २०० रुपये प्रति किंटल होता. त्यानंतर दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत सुमारे १५० रुपयांची वाढ झाली. मात्र, गेल्या काही दिवसांत दरवाढीचा वेग वाढला असून दिवसाला ३०० ते ४०० रुपयांनी दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या साखरेचा घाऊक दर सुमारे ७ हजार रुपये क्विंटल, म्हणजेच ७० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. आगामी काळात हा दर ८० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

सरकारी शाळेच्या पाहणीला गेलेल्या CJPच्या टीमवर तुफान दगडफेक; जयपूरमध्ये सकाळीच मोठा राडा!

देशांतर्गत साखरेचा उपलब्ध साठा कमी होणे, मागील हंगामातील उत्पादनावर झालेला परिणाम, ऊसाचा इथेनॉल निर्मितीकडे झालेला वापर आणि महाराष्ट्र-कर्नाटकातील हवामानाची स्थिती ही दरवाढीमागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. त्यातच ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी असे सलग सण असल्याने साखरेची मागणी वाढण्याची शक्यता आहे. साखरेबरोबरच गुळाच्या दरातही वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी ५३ ते ६० रुपये किलो असलेला गूळ आता सुमारे ७५ रुपये किलोवर पोहोचल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरवाढीमुळे घरगुती बजेटवर अतिरिक्त भार पडणार असून, सणासुदीच्या काळात गोडधोड करण्याची परंपरा जपताना सर्वसामान्यांना वाढीव खर्चाचा सामना करावा लागणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती दर?
मुंबई – काही ठिकाणी 60 काही ठिकाणी 65 रुपये किलोने साखर दर
सांगली- 80 रुपये किलो
बुलढाणा- 80 रुपये किलो
वाशिम- 80 रुपये किलो
कोल्हापूर-75 रुपये किलो
नाशिक- 75 रुपये किलो
पुणे – 72 रूपये किलो
परभणी- 70 रुपये किलो
सातारा- 70 रुपये किलो
पालघर- 70 रुपये किलो
भंडारा – 70 रुपये किलो
जळगाव – 68 रुपये किलो
अकोला- 65 रूपये किलो
रत्नागिरी – 62 रुपये किलो
चंद्रपुर – 60 रुपये किलो
नांदेड – 65 रुपये किलो
पालघर – 65 ते 70 रुपये प्रति किलो
लातूर – 70 रुपये किलो
हिंगोली – 70 रुपये किलो
वाशिम प्रति 78 ते 80 रु प्रति किलो
नागपूर 68 ते 70 रु प्रति किलो
बुलढाणा 78 रु ते 80 रु प्रति किलो
गोंदिया 70 रु प्रति किलो
भंडारा 68 रु प्रति किलो
वर्धा 62 ते 64 रुपये प्रति किलो
अकोला 65 रुपये प्रति किलो
चंद्रपूर 60 प्रति किलो
अमरावती 75 रु प्रति किलो
यवतमाळ 75 ते 78 रु प्रति किलो
गडचिरोली 60 रुपये प्रति किलो

ताज्या बातम्या

Nashik Accident News : दोन ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात तिघांचा...

0
चांदवड | प्रतिनिधी | Chandwad तालुक्यातील कुंदलगाव शिवारातून जाणाऱ्या मालेगाव-मनमाड मार्गावर (Malegaon-Manmad Highway) शनिवारी (दि. २६) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन...