Sunday, September 22, 2024
Homeनगरअतिरिक्त ऊस गाळपासाठी 51.44 कोटींचा निधी

अतिरिक्त ऊस गाळपासाठी 51.44 कोटींचा निधी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

2021-22 मधील गळीत हंगामातील 1 मे पासून म्हणजेच अतिरिक्त ऊस गाळप अनुदान वितरीत करण्यास सहकार विभागाने मान्यता दिली आहे. ऊस वाहतूक अनुदान रूपये 20 कोटी व ऊस गाळप अनुदान रूपये 31.44 कोटी अशा एकूण रूपये 51.44 कोटी निधी वितरणास सहकार विभागाने मान्यता दिली असून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे नगर जिल्ह्यासह राज्यभरातील अतिरिक्त ऊस गाळप केलेल्या शेतकर्‍यांना आणि साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे.

शेतकर्‍यांच्या शिल्लक ऊसाचे गाळप होण्यासाठी दिनांक 1 मे, 2022 नंतर गाळप झालेल्या शेतकर्‍यांच्या सर्व ऊसाला ऊस गाळप अनुदान म्हणून रूपये 200/- प्रतिटन प्रमाणे संबंधित कारखान्यांना अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. त्यासाठी दिनांक 1 मे, 2022 नंतर गाळप झालेल्या 52 लाख टन ऊस रूपये 200/- प्रति टन प्रमाणे लागणारे अनुदान रूपये 104 कोटी पैकी आता 31.44 कोटी एवढया निधी वितरणास मान्यता सहकार विभागाने दिली आहे.

साखर आयुक्तालय, पुणे यांनी दिनांक 1 मे2022 पासून गाळप झालेल्या अनिवार्य ऊस वितरण आदेश दिलेल्या ऊसासाठी 50 कि.मि. पेक्षा अधिक वाहतूकीवरील खर्च प्रति टन प्रति किमी रूपये 5/- प्रमाणे ऊस वाहतूक अनुदान संदर्भ क्रमांक 3 च्या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेले आहे. त्यानुसार साखर आयुक्तालयाने अनिवार्य ऊस वितरण आदेश दिलेला ऊस 5.16 लाख टन ऊस वाहतूक करावी लागली व त्यांचे सरासरी अंतर 77.5 कि.मी. होते. सदर अंतरास प्रति टन प्रति कि.मी. रूपये 5/- प्रमाणे लागणारे अनुदान 5द78द5.16= रूपये 19.99 (20 कोटी) एवढया रक्कमेच्या निधी वितरणास मान्यता दिली आहे.

शेतकर्‍यांच्या शिल्लक ऊसाचे गाळप होण्यासाठी दिनांक 1 मे, 2022 नंतर गाळप झालेल्या शेतकर्‍यांच्या सर्व ऊसाला ऊस गाळप अनुदान म्हणून रूपये 200/- प्रतिटन प्रमाणे संबंधित कारखान्यांना अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. त्यासाठी दिनांक 1 मे, 2022 नंतर गाळप झालेल्या 52 लाख टन ऊस रूपये 200/- प्रति टन प्रमाणे लागणारे अनुदान रूपये 104 कोटी पैकी आता 31.44 कोटी एवढया निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे.

ऊस वाहतूक अनुदान रूपये 20 कोटी व ऊस गाळप अनुदान रूपये 31.44 कोटी अशा एकूण रूपये 51.44 कोटी निधी वितरणास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यातआली आहे.

ऊस वाहतूक अनुदान व ऊस गाळप अनुदानाची सरासरी विचारात घेवून प्रस्ताव सादर केला आहे. परंतु कारखानानिहाय ऊस वाहतूकीबाबत प्रत्यक्ष वाहतूकीची विगतवारी तसेच ऊस गाळपाबाबत दिनांक 1 मे, 2022 नंतर गाळप झालेल्या ऊसाचे कारखानानिहाय प्रत्यक्ष झालेले गाळप विचारात घेवून अनुदान वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या