Thursday, May 15, 2025
Homeधुळेमाहेरी आलेल्या विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

माहेरी आलेल्या विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

- Advertisement -

राखी पोर्णिमेनिमित्त माहेरी आलेल्या विवाहितेने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दोंडाईचातील महादेवपूरा परिसरात काल घडली. यबाबत दोंडाईचा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

जयश्री योगेश भदाणे (वय 20 रा.प्रिपाड,नरडाणा ता.शिंदखेडा) असे मयत विवाहितेचे नाव आहे. ती राखी पोर्णिमेनिमित्त काही दिवसांपुर्वी माहेरी आली होती. काल दि. 11 रोजी तिचे वडील भटू पाटील हे आपल्या पत्नीसोबत दोंडाईचा गावातील भाजीमंडीत कामानिमित्त गेले होते. त्यावेळी जयश्री ही घरात एकटीच होती.

सकाळी 11 वाजेच्या सुमारास तिने घराच्या पत्री छतास असलेल्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही माहिती फोनवरुन तिच्या वडीलांना विलास कोळी याने दिली. भटू पाटील हे त्वरीत घरी आले.

आजुबाजुच्या लोकांच्या मदतीने जयश्रीला दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. जयश्रीच्या आत्महत्येचे कारण समजु शकलेले नाही. याबाबत याप्रकरणी भटू पाटील (रा.महादेवपूरा, दोंडाईचा) यांच्या माहितीवरून प्रथमदर्शी दोंडाईचा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : सीसीटीव्ही लावा, सेवकांची मद्य चाचणी करा; राज्य सरकारची...

0
मुंबई | Mumbai  महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) लहान मुलांचे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी राज्यातील शाळांसाठी नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार राज्यातील प्रत्येक शाळांत सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे...